अक्कलकोट : ऊस बिल थकीत रक्कम न दिल्याने आचेगाव जयहिंद शुगरच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज एल्गार पुकारला. वजन काटा, क्रेन बंद पाडत कारखाना ३ तास बंद पाडला. गेल्या दोन वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिल थकीत ठेवल्याने शेतकरी आक्रमक झाले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जय हिंद शुगर प्रा लिमटेड या साखर कारखान्याने सन २०१९ -२० या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत रक्कम न दिल्याने अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जय हिंद शुगरचे वजन काटा बंद करत क्रेन बंद करून तीव्र आंदोलन केले.
गेल्या दोन वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला लाखो टन ऊस जय हिंद कारखान्याला गळपासाठी पाठवला होता. २०१९ साली साखर कारखान्याची स्पर्धा होती. त्यामुळे अनेक कारखान्याने एफआरपी पेक्षा वाजवी दर देण्याचे आश्वासन दिले. याप्रमाणे जय हिंद शुगरने सुद्धा एफआरपीपेक्षा २५११ रुपये प्रति टन दर देण्याचे आश्वासन देत तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊस आपल्या कारखान्याकडे नेले.
यापैकी काही शेतकऱ्यांना अश्वासनाप्रमाणे २५११ रुपये दर भेटला व जवळपास ६०० शेतकऱ्यांना २२३८ दर भेटला आणि उर्वरित २७३ रुपये रक्कम शेतकऱ्यांना देणे असताना जय हिंद कारखाना जाणूनबुजून थकवले.
Farmers attack: Jayhind factory in Achegaon closed for three hours
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यासाठी शेतकऱ्यांनी कारखाना व पोलीस प्रशासनास लेखी निवेदन देत कळवले आणि या व्यतिरिक्त जय हिंदच्या विरोधात आजवर पाच वेळा उपोषणे आणि आंदोलने ही केली पण याचा काहीही परिमाण जय हिंद शुगरला झाला नाही.
दोन वर्षांपासून या पीडित शेतकऱ्यांना खोटे सांगून वेळोवेळी आश्वासन दिले. गेले दोन वर्षे कोरोनाचा काळ असल्याने शासनाच्या नियमानुसार जमाव बंदीचा आदेश होता. त्यामुळे हे पीडित शेतकरी एकत्रित येऊन आंदोलन करू शकले नाहीत. पण या काळात शेतकरी स्वतः कारखाना प्रशासनाला थकीत रक्कमेची मागणी करत होते. पण कारखाना वेगवेगळे करणे सांगून वेळ मारून नेत असत. थकीत रक्कमे बद्दल विचारले असता आज करू उद्या करू असे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची तोंडे पुसले.
वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेले ऊस कारखान्याला पाठवून दोन वर्षे होत आली पण ६०० शेतकऱ्यांना उर्वरित थकीत रक्कम मिळत नाही. शेतकऱ्यांना कोण वाली आहे का नाही ? म्हणत आज सोमवारी सकाळी १० च्या दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जय हिंद शुगर आचेगाव येथे एकत्रित येऊन कारखान्याच्या विरोधात एल्गार पुकारला.
इतक्या मोठ्या आंदोलनास्थळी कारखान्याचा एक ही प्रतिनिधी भेट दिला नाही आणि फिरकले सुद्धा नाही. शेवटी पोलीस प्रशासनाने जय हिंदच्या प्रामुखाला दूरध्वनीवरून संपर्क करून कळवले त्यानंतर येत्या रविवारी याबाबत निर्णय घेण्यात येईल असे कळाले. येणाऱ्या काळात जय हिंद शुगर कारखान्याच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल, असे ही शेतकरी वर्गातून सांगितले.