Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल

Surajya Digital
Last updated: 2022/04/13 at 10:35 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई – मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल होत धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.

४६ वर्षांचे असलेले धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू असून टोपे यांनी डॉक्टरांची भेट घेऊन नंतर पत्रकारांना मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती दिली. ते म्हणाले की, मुंडे यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. त्यांचे एमआरआय केले आहे. परिस्थिती नियंत्रित आहे. मी मुंडे यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. त्यांनी गप्पा मारल्या. डॉ. समधानी यांच्या देखरेखीखाली मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाकी सविस्तर माहिती ऑफिसमध्ये आल्यावरच देता येईल, असे टोपे म्हणाले.

सोमवारी दिवसभर बीड आणि परभणी जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. मंगळवारी ते मुंबईत हाेते. सायंकाळी साडे सहा वाजता ते जनता दरबार आटोपून निवासस्थानाकडे निघाले असता त्यांच्या अचानक छातीत दुखू लागल्यानंतर तातडीने ब्रीच कँडीत नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, काळजीचे कारण नाही, असे कुटुंबीयांनी सांगितले. हे नेमके कशामुळे घडले अशी विचारणा केल्यावर टोपे म्हणाले की, आज जनता दरबार होता. त्यासाठी मुंडे हे धावपळ करत होते. या ताणामुळे असे होऊ शकते. डॉक्टरांनी मला बोलावलेले आहे.

Minister Dhananjay Munde admitted to hospital with heart attack

Maharashtra's Social Justice Minister and NCP leader
Dhananjay Munde admitted to Breach Candy Hospital in Mumbai after he suffered a minor heart attack.

(File Pic) pic.twitter.com/y5y9k99VW1

— ANI (@ANI) April 12, 2022

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

आता पुढील तीन चार दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात त्यांची पत्नी करुणा मुंडेने धनंजय यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. करुणा मुंडे या २०२४ मध्ये निवडणुकीत उभ्या राहणार आहेत. मुंडे यांच्या अनेक पत्नी आणि सहा मुले असल्याचा दावाही त्यांनी केेला आहे. मुंडेवर असे आरोप झाल्यामुळे ते सार्वजनिक जीवनात थोडे मागे राहिले होते.

सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे, कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. दरम्यान सध्या तरी मुंडेंना काही धोका नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पुढील तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचेही टोपेंनी सांगितले.

 

□ धनंजय मुंडेंना हृदयविकाराचा झटका ही माहिती चुकीची – पंकजा मुंडे

#heartattack #PankajaMunde #DhananjayMunde #surajyadigital #मुंडे #सुराज्यडिजिटल #wrong #information

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देण्यात आली होती. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. ‘धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका ही चुकीची माहिती आहे, त्यांना विकनेस आला होता, भोवळ आली होती, असं त्यांनी सांगितलं. तसेच उद्या ते घरी येतील त्यांची तब्येत नॉर्मल आहे, असंही त्या म्हणाल्या.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Minister #DhananjayMunde #admitted #hospital #heartattack, #मंत्री #धनंजयमुंडे #हृदयविकार #झटका #हॉस्पिटल #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा, नाहीतर : राज ठाकरे
Next Article सोलापुरात पहाटे ‘द बर्निंग ट्रक’चा थरार, सतत फटाक्यांचे स्फोट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?