Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: किरीट सोमय्या यांना अखेर अटकपूर्व जामीन मंजूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

किरीट सोमय्या यांना अखेर अटकपूर्व जामीन मंजूर

Surajya Digital
Last updated: 2022/04/13 at 7:02 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

मुंबई : सेव्ह विक्रांत प्रकरणात अडकलेले किरीट सोमय्या यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. सोमवार 18 एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देशही किरीट सोमय्यांना दिले आहेत. अटक झाल्यास 50 हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. तसेच, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सोमवार 18 एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देश किरीट सोमय्या यांना दिले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेनं आज अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटिस पाठवली होती. या प्रकरणात किरीट सोमय्यांची बाजू मांडण्यासाठी वकील विवेकानंद गुप्ता हे पोलीस आयुक्त कार्यालयात गेले होते. त्यामुळे आजही किरीट सोमय्या चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. तसेच, आयएनएस विक्रांत प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. त्यावर बोलताना योग्य वेळी किरीट सोमय्या समोर येतील, असं त्यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

□ 57 कोटींची बाब खोटी

किरीट सोमय्यांचे वकिल विवेकानंद गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, 9 एप्रिलला आम्ही सांगितलं होतं की, किरीट सोमय्या बाहेर आहेत, सांगितलं होतं. किरीट सोमयाचा यांचं पाचपानी स्टेटमेंट दिलं आहे. आम्ही 13 तारखेनंतर आम्ही चौकशीला येऊ, असं आधी म्हटलं होतं. काही ट्वीट पुरावे म्हणूनही दिले आहेत. निव्वळ दोन हजारांची केस आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आहे. सरकार पोलिसांवर दबाव आणत आहेत.” तसेच, पुढे बोलताना, किरीट सोमय्या आणि नील सोमय्या इकडेच आहेत. ते कायदेशीर लढाई लढत आहेत, असं सांगितलं. तर 57 कोटींची बाब खोटी आहे, ज्यांनी आरोप केला त्यांनी सिद्ध करावं. योग्य वेळी किरीट सोमय्या समोर येतील, असंही त्यांनी सांगितलं.

Kirit Somaiya finally granted pre-arrest bail

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ सैन्यावरील प्रेमापोटी लोकांनी दिला निधी

माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार, त्यानं दिलेली वर्गणी ही किरीट सोमय्या आणि नील सोमय्याच्या लोकांनी गोळा केली होती. याशिवाय सोशल मीडियावर चर्चगेट, दादर, भांडूप, मुलूंड अशा विविध रेल्वे स्थानकांबाहेर हा निधी गोळा करण्यात आल्याची अनेक छायाचित्र आहेत.

अनेक दिवस ही वर्गणी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू होता, ज्यात स्टीलच्या एका पेटीत लोकं येता- जाता पैसे टाकत होते. यातनं केवळ 11 हजारांच्या आसपास निधी गोळा झाल्याचा जर सोमय्यांचा दावा आहे, तर तो हास्यास्पद आहे. कारण तक्रारदार भोसले यांनीच त्यात दोन हजार रूपये टाकले होते, याशिवाय अन्य काही लोकांनीही हजारांमध्ये देणगी दिलीय. त्यामुळे 11 हजारांची रक्कम तर चर्चगेट स्टेशनबाहेर एका दिवसांत जमा झाले असतील. तसेच तक्रारदार हा माजी सैनिक आहे.

तेव्हा त्यांच्या हेतूवर सवाल उठवणंच चुकीच ठरेल. देशावरील, सैन्यावरील प्रेमापोटी लोकांनी हा पैसा दिला होता. त्यामुळे त्याचं नेमकं काय झालं याचा तपास होणं आवश्यक आहे. हा पैसा कुणाच्या खात्यात गेला? त्यातनं काही मालमत्ता विकत घेतलीय का? याची चौकशी करण्यासाठी आरोपींच कस्टडी मिळणं आवश्यक असल्याची भूमिका मुंबई पोलिसांनी घेतली आहे.

 

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

TAGGED: #KiritSomaiya #finally #granted #pre-arrest #bail, #किरीटसोमय्या #अटकपूर्व #जामीन #मंजूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
Next Article जबरी चोरीचा फिर्यादीच निघाला चोर; वेळापूर पोलिसांनी बारा तासात केले चोरट्याला जेरबंद

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?