सातारा / मुंबई : गुणरत्न सदावर्तेंना दिवसांची पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. सातारा जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांची सातारा पोलीस चौकशी करत आहेत.
छत्रपतींच्या वारसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा शहर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता सदावर्ते यांना सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यावेळी कोर्टात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला.
युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी युक्तिवादाचे अवलोकन करून निर्णय दिला.
सरकार पक्षाने १४ दिवसांची पोलीस कोठडी मागत विविध मुद्द्यांचा तपास करायचा असल्याचे सांगितले. यावेळी तपास अधिकारी आणि सरकार पक्षाचे दोन वकील असे तिघेजण बोलले. सरकार पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने सर्व मुद्दे खोडून काढण्यात आले आणि पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. युक्तिवाद सुरू असताना दोन्ही पक्षांमध्ये दोनदा खडाजंगी झाली.
सातारा शहर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना गुरुवारी रात्री अटक केल्यानंतर आज सातारा न्यायालयात हजर केले. या पार्श्वभुमीवर शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खासदार उदयनराजे यांचा पराभव का झाला? असा मुद्दा बचाव पक्षाने मांडताच सरकार पक्षाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. यावर बचाव पक्षाने हे वक्तव्य मागे घेत सपशेल माफी मागितली. माफीनाम्यानंतर सरकार पक्षाने सुमोटो गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली.
Gunaratna Sadavarten remanded in police custody for 4 days for making offensive remarks
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
ऑक्टोबर २०२० मध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यात मराठा आरक्षण प्रकरणी एका वृत्तवाहिनीवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबतच्या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी काल गुरुवारी मुंबईतून ताब्यात घेतलं होते.
□ संदीप गोडबोलेला कोणत्या आमदाराची मदत ?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरासमोर झालेल्या हल्ल्याचा तपास वेगाने चालू आहे. हल्ल्याचे नियोजन संदीप गोडबोलेने केले असा पोलिसांचा आरोप आहे. चौकशीदरम्यान आपण 7 एप्रिलला आमदार निवासात होतो, हल्ल्याच्या नियोजनाशी माझा संबंध नाही अशी त्याची बाजू संदीप गोडबोलेने मांडली आहे. दरम्यान एखाद्या व्यक्तीला आमदार निवासात राहण्यासाठी, आमदाराच्या शिफारसीचं पत्र लागतं. आता तो आमदार कोण हा तपास चालू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला प्रकरणात नागपुरातून बुधवारी ताब्यात घेतलेला एसटीचा बडतर्फ कर्मचारी संदीप गोडबोले हा बहुजन अधिकारी- कर्मचारी संघटनेचा विभागीय अध्यक्ष असल्याचे पुढे येत आहे.
संदीप गोडबोले याला मुंबई पोलिसांनी प्रथम भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून बोलावले. परंतु तो टाळाटाळ करत चुकीचा पत्ता सांगत होता. संदीपकडून फारसा प्रतिसाद नसल्याचे बघत स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी त्याच्या भ्रमणध्वनीवरून तो कुठे आहे, याचा शोध घेतला. त्यानंतर लगेच जलालखेडा येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.