Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरसाठी आजपासून उजनीतून पाणी सोडणार; पिण्याच्या पाण्याची होणार सोय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

सोलापूरसाठी आजपासून उजनीतून पाणी सोडणार; पिण्याच्या पाण्याची होणार सोय

Surajya Digital
Last updated: 2022/04/16 at 12:15 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

सोलापूर : उजनी धरणातून आज शनिवारपासून सोलापूर शहरासाठी भीमा नदीत सहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असून २५ एप्रिलपर्यंत हे पाणी नदीतून सुरू राहील, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.

शुक्रवारी, उजनी धरणात ५३ टक्के पाणी साठा होता. सध्याच्या उन्हाळ्यात पिण्यासाठी, शेती व इतर सर्व उद्योगासाठी पाणी कमी पडणार नाही, असे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.

सोलापूर शहराला टाकळी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या नवीन दोन मोठे पंप बसवण्यात आले आहेत.  त्यामुळे टाकळी बंधाऱ्यातील पाणी २६ किंवा २७ एप्रिलपर्यंत पुरेल अशी वस्तुस्थिती आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी २५ एप्रिलपर्यंत टाकळी बंधाऱ्यात पाणी आले पाहिजे असे पत्राद्वारे जलसंपदा विभागाला कळवले आहे. या नियोजनानुसार उद्या सकाळी धरणातून व वीजनिर्मिती केंद्रामधून १६०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून हे पाणी पुढे नदी प्रवाहात येते.

Water will be released from Ujjain for Solapur from today; Drinking water will be provided

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

त्यानंतर १७ एप्रिलच्या सकाळपर्यंत धरणाच्या चार दरवाज्यातून ४४०० क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येणार आहे. एकूण ६ हजार क्युसेक पाणी आठ ते नऊ दिवस नदी प्रवाहात राहणार आहे. हे प्रवाही पाणी २३ किंवा शेतीस २४ एप्रिलपर्यंत टाकळी बंधाऱ्यात पोहोचेल व २५ एप्रिलपर्यंत टाकळी व चिंचपूर बंधारे पूर्ण क्षमतेने भरतील व पुरेसा पाणीसाठा होईल.

दरम्यान, या पाण्यामुळे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आदी शहरांना व भीमा नदीकाठावरील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांवरील नागरिक व पशुधनाला पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. याचप्रमाणे भीमा नदीवर असलेले को.प.चे १७ बंधारे या पाण्यामुळे भरणार आहेत.

सध्या उजनी धरणातून कालवा, बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा ९२ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा २८ टीएमसी आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: 'Water #released #Ujjain #Solapur #today #Drinkingwater #provided, #सोलापूर #उजनी #पाणी #पिण्याच्या #पाण्याची #सोय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातील चारजण तडीपार; हॉस्पिटलमध्ये दंगा करून तोडफोड
Next Article धक्कादायक, भीम जयंतीत नाचण्याच्या कारणावरून खून

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?