– काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना एकूण 94,767 मते
– भाजपच्या सत्यजित कदम यांना एकूण 76,123 मते
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला पूर्ण झाली आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. दरम्यान विजयी आमदार जयश्री पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरच्या जनतेनं आपला शब्द पाळला आहे. अण्णांच्या मागे माझी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली. महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि माझी स्वाभिमानी जनता दोघांनी आपला शब्द पूर्ण केला. हा विजय महाविकास आघाडीचा आणि स्वाभिमानी जनतेचा आहे, असं त्या म्हणाल्या.
कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीत जयश्री जाधव या काँग्रेसकडून निवडणुकीला उभ्या आहेत. आज सकाळपासून निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत, त्यात त्यांची आघाडी दिसून येत होती. याच पार्श्वभूमीवर जयश्री जाधव यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. शिवसेनेने या निवडणुकीत मला एखाद्या बहिणीप्रमाणे साथ दिली. असे त्या म्हणाल्या.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणुक लागली होती. सुरूवातीला ही निवडणूक बिनविरोधी करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून करण्यात आला. मात्र भाजपने या जागेवर जयश्री पाटील यांना भाजपकडून लढण्याची ऑफर दिली. मात्र जयश्री पाटील यांनी भाजपकडून लढण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने या जागी सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली. तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील हे या निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात ठाण मांडून बसले होते. मात्र त्याचा करिश्मा दिसून आला नाही.
Jayashree Jadhav wins Kolhapur North by-election
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या पार पडल्या. यात सुरूवातीपासूनच जयश्री पाटील या आघाडीवर होत्या. शेवटच्या 26 व्या फेरीपर्यंत एकूण 18901 मतांनी जयश्री जाधव विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर कोल्हापुरात जल्लोष सुरू झाला. सतेज पाटील यांनी ही जागा काँग्रेसच्या गोटात पुन्हा यावी यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. सुरूवातील शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांची उघड नाराजी दिसून आली होती. त्यानंतर मात्र काँग्रेसला त्यांची नाराजी दूर करण्यात मोठं यश आल्याने हा विजय काँग्रेससाठी आणखी सोपा झाला आहे.
□ आम्हाला पराभव मान्य – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्हाला मतदारांचा निर्णय मान्य आहे. आमचा मुद्दा विकासाचा होता. आम्ही वारंवार मांडत होतो की काँग्रेसने 50 वर्ष केंद्रात, राज्यात आणि शहरात काय केलं हे मांडा. आम्ही पाच वर्षात काय केलं हे मांडतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी तर थेट ईडीचाही उल्लेख या निवडणुकीत केला होता. मात्र मतदारांचा कल मान्य केलाच पाहिजे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे, याबाबत बोलताना माझ्यावर टीका होणे नवीन नाही.
मतदारांनी ठरवलेला निकाल आम्हाला मान्य आहे. तसेच आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढलो, असेही त्यांनी सांगितलं आहे. तसेच या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा आणणाऱ्या भाजपला हे जनतेने दिलेले उत्तर आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.