अक्कलकोट : महाराष्ट्रपेक्षा कर्नाटक राज्यात पेट्रोल १० तर डिझेल ९ रुपये प्रति लिटर स्वस्त मिळत आहे. यामुळे अक्कलकोट तालुक्यातील महाराष्ट्राच्या हद्दीतील बहुतांश वाहनधारक हे कर्नाटक हद्दीतील पंपामधून तेल भरत आहेत. यामुळे आर्थिक बचत होत असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांमधून येत आहे.
अक्कलकोट तालुक्याच्या अनेक भागात कर्नाटक सीमा लागून आहे. यामुळे अनेक गावचे ग्रामस्थ मागील अनेक वर्षांपासून शेती मालाचे खरेदी विक्री असो किव्हा लग्न कार्याचे खरेदी असो. असे अनेक प्रकारचे व्यवहार होत असते. त्याबरोबरच मागील काही दिवसापासूनच महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल दर रोज वाढत आहे. शंभरी पार यापूर्वीच झालेले आहे. असे असताना शेजारील कर्नाटक राज्यात पेट्रोल, डिझेल दर प्रत्येकी, प्रति लिटर दहा रुपयांने स्वस्त मिळत आहे.
यामुळे सीमावर्ती असलेल्या ग्रामस्थांनी तर लागेल तेव्हा कर्नाटकातून इंधन भरतात. याबरोबरच काही वाहनधारकांना इतर कामानिमित्त कर्नाटक जाता क्षणी प्रथमतः वाहनाचे टाक्या फुल्लपॅक करून आणत आहेत. डिझेल,तेच पेट्रोल आम्हाला स्वस्त कुठे मिळते तिथे आम्ही भरू, अशी प्रतिक्रिया देत आहेत.
महाराष्ट्रात पेट्रोल-१२० रुपये ५१ पैसे तर डिझेल-१०३ रुपये २१ पैसे असे दर प्रति लिटरला आहे. तर शेजारील कर्नाटक राज्यात पेट्रोल-१११ रुपये तर डिझेल-९५ रुपये इतकी दर प्रती लिटरच्या मागे आहे. एकंदरीत पेट्रोल १० रुपये तर डिझेल ९ रूपयाने स्वस्त मिळत आहे.
To live in Maharashtra, to fill up petrol in Karnataka
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
म्हणून सीमावर्ती भागातील गोगाव, खैराट, वागदरी, भोसगे, सिंनूर, बबलाद, बोरोटी, तोळणूर, हैद्रा, तडवळ, मंगरूळ, शेगाव, आळगी यासह रोज ३० ते ४० गावातील जीप,टमटम, कार, ट्रॅक्टर, टेम्पो, जेसीबी, पोकलेन, आदी वाहनधारक कर्नाटकात तेल भरणे पसंद करीत आहेत. याबरोबरच इतर गावांनी सुद्धा काही कारणांमुळे कर्नाटकात गेले की, टाकी फुल्ल करून येत आहेत. यामुळे अक्कलकोट शहर व परिसरातील पंपावरील तेल खप कमी झालेले आहेत.
सीमावर्ती भागातील कर्नाटकातील मणूर-२, लच्याण-१ जवळ, बळोरगी-१, हिरोळी-१, मादनहिप्परगा-१, असे दहाहून अधिक पंप सीमावर्ती भागात आहेत. यामुळे महाराष्ट्रातील वाहनधारकांना सोयीचे झाले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वाहनधारक इरेशा धनशेट्टी म्हणाले, मी नागणसूर या सीमावर्ती भागातील रहिवासी आहे. मी भाड्याने जीप देत असतो. मी या व्यवसायात मागील दहा वर्षांपासून आहे. सध्या महाराष्ट्रात कर्नाटक पेक्षा पेट्रोल, डिझेल दर जास्त आहे. यामुळे मी कर्नाटकातील पंपामधून तेल भरीत आहे. मला ज्या ठिकाणी स्वस्त मिळतो त्या ठिकाणी भरत असतो. महाराष्ट्रात महाग आणि कर्नाटकात स्वस्त कस अस प्रश्न मला पडला आहे.
मैंदर्गीतील बाबुशा जकापुरे म्हणाले, मी मागील वीस वर्षांपासून रोज जीप भाड्याने देत असतो, मागील आणि आताच्या तेलाच्या दरात फार फरक पडला आहे. मात्र पहिल्यांच अस घडला आहे की, कर्नाटकात महाराष्ट्रपेक्षा स्वस्त पेट्रोल, डिझेल मिळत आहे. यामुळे मी दुधनी भागातील कर्नाटक हद्दीतील पंपावर डिझेल भरत असतो.