पुणे : भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. भोंग्यांचा सर्वांना त्रास होतोय. जर ३ तारखेपर्यंत त्यांना काही कळलं नाही किंवा देशातल्या न्यायव्यवस्थेचा निर्णय योग्य वाटत नसेल. तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. दरम्यान त्यांनी महाराष्ट्रदिनी आपण औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहोत. अशी घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच 3 मे नंतर भोंग्याविरोधात मोठं आंदोलन राज्यात उभारण्यात येईल. असं ते म्हणाले.
दरम्यान, संजय राऊतांनी राज ठाकरे यांना ‘नवहिंदुत्ववादी ओवेसी’ असं म्हणत टीका केली. राज्य सरकार ला राज ठाकरे यांनीमशिदीवरील भोंगे उतारवण्याबाबत कारवाई करण्याचे 3 मे पर्यंतचे अल्टिमेटम दिले असून त्यावर गृहमंत्र्यांनी या अल्टिमेटम ला नाकारत मशिदीवरील भोंगे उतरवले जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, “माणुसकीच्या नात्याने मुस्लिमांनी भोंगे बंद करावेत. आम्हाला राज्यातील शांतता भंग करायची नाही; पण भोंगे बंद करा. पाच वेळा भोंगा लावत असाल तर आम्ही पाचवेळी हनुमान चालिसा वाजविणार आहे. देशापेक्षा धर्म मोठा असा कामा नये. आमच्याही हातात शस्त्रे आहेत, ते आम्हाला हातात घेण्यास भाग पाडू नका “. १ मे ला औरंगाबादला जाहीर सभा घेतली जाणार आहे. तर ५ जूनला अयोध्येत जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
Raj Thackeray will tour Ayodhya with his colleagues … then we will play Hanuman Chalisa five times
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
“जर मशिदीवरील भोंगे अनधिकृत असतील, तर आमच्या भोंग्यावर कारवाई का? मशिदीच्या भोंग्यांचा त्रास हा फक्त हिंदुंनाच नाही, तर मुस्लिमांनाही होतो आहे. देशातील सर्व हिंदु बांधवांनी तयार रहावं. आमच्या मिरवणुकींवर दगडफेक होणार असेल तर आम्हीही गप्प बसणार नाही. आमच्याही हातात शस्त्रे आहेत, ती शस्त्रं हातात घेण्यास भाग पाडू नका”, असाही इशारा राज ठाकरे यांनी दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मनसेचा आगामी रोडमॅप काय असेल तो स्पष्ट केला आहे. गुढीपाडवा मेळाव्यापासून राज ठाकरे हे संपूर्ण देशभरातच पुन्हा चर्चेत आले आहेत.
● राज ठाकरे काय म्हणाले
– राज ठाकरेंची मोठी घोषणा, पाच जूनला अयोध्येला जाणार
– तीन मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर जशास तसे उत्तर देण्यास देशभरातील हिंदू बांधवांनी तयार राहावे: राज ठाकरे
– मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय: राज ठाकरे
– पाच जून रोजी मी सहकाऱ्यांसह अयोध्येचा दौरा करणार : राज ठाकरे
– ‘एका मुस्लिम पत्रकाराने बाळा नांदगावकर यांना सांगितले की, त्यांचे बाळ लहान असताना त्यांना भोंग्याचा त्रास झाला. त्यांनी स्वतः मशिदीत जाऊन भोंगा बंद करायला सांगितला’
– भोंग्यांचा त्रास फक्त हिंदूंनाच नाही तर मुस्लिमांनाही होतो, हा विषय धार्मिक नाही तर सामाजिक आहे
– माझी हात जोडून विनंती आहे आम्हाला अन्य पर्याय वापरायला लावू नका
– महाराष्ट्राची शांतता भंग करण्याची आमची मुळीच इच्छा नाही, पण भोंगे बंद करा
– या देशात सर्वोच्च न्यायालयापेक्षा मशिदीवरील भोंगा मोठा आहे का
– त्रास होतो तरी तो का सहन करायचा
– कायद्यापेक्षा भोंगा मोठा आहे का
– कुठलाही धर्म इतरांना त्रास द्या असे सांगत नाही की शिकवित नाही
– ३ मे पर्यंत मुदत दिली आ,हे राज्य सरकार योग्य ती कार्यवाही होईल अशी अपेक्षा आहे
■ ‘काय अजित पवार साहेब कसं वाटतंय बळजबरीने आरती करून…?’
भाजप नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्यावर टीका केली आहे. “आज कधी नव्हे ते अजित पवारांना हनुमान जयंतीच्या निमित्ताने आरती करताना बघितलं, काय अजित पवार साहेब कसं वाटलं जबरदस्ती आरती करताना ?? हनुमान जयंतीनिमित्त वातावरण ढवळून निघाल्याने ज्यांना मंदिरात जायची एलर्जी होती ते सुद्धा भगवे पट्टे घालून मंदिरात धडपडत होते,” असे निलेश राणेंनी म्हटले आहे.