Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तरणा झाला की म्हातारा आणि सून पडली की सासू पडणारच!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
ब्लॉग

तरणा झाला की म्हातारा आणि सून पडली की सासू पडणारच!

Surajya Digital
Last updated: 2020/08/11 at 5:25 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचे बोलकं वर्णन केलं जातं. त्याच भाषेत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय, त्याच्या पाठोपाठ म्हाताराही पडून गेला आहे. आता सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल. हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत. बहुधा प्रत्येक पाऊसनक्षत्रासाठी गावाकडे स्वतंत्र म्हणी आहेत.
पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती (स्वाती नक्षत्रातला पाऊस पिकाला खर्‍या अर्थाने उभारी देतो, रूपरंग देतो. त्यामुळे या नक्षत्रात पाऊस झाला तर खर्‍या अर्थाने माणिक मोती पिकतात)

पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा (चित्रा नक्षत्रातला पाऊस बिनभरवशाचा असतो. पडला तर इतका पाऊस पडतो की तो काहीच शिल्लक ठेवत नाही, अगदी वाडग्यात काढून ठेवलेलं उष्टावण असो की ताजं जेवण असो ते एकतर सादळून तरी जातं नाहीतर बेचव तरी होऊन जातं. म्हणून मग त्याची चव जाते. मग त्याचं वर्णन भात खाईना कुत्रा अशा शेलक्या शब्दात आलंय)
,
पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा (आर्द्रा नक्षत्रातला पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील. काही खेड्यात गरदाडा असा ही शब्द आढळतो. त्याचा अर्थ खबदाड, भागदाड असा होतो. म्हणजे काय तर हा पाऊस इतक्या ताकदीने पडतो की घरच्या माळवदाला भगदाडे पडावीत. एकंदर मतीतार्थ असा की आर्द्राचा पाऊस पडझड करून जातो.

पडतील मघा तर चुलीपुढे हगा अन आभाळाकडे बघा (इथे चुलीपुढे हगा असं म्हटलेलं आहे. घरात अन्यत्र वेगवेगळ्या जागा आहेत जशा की कोनाडे, ढेलज, पडवी, अंगण, ओसरी, परस, माळवद, मोरी, सांदाडी, सज्जा, शेजघर, माजघर इत्यादी. तरीही चुलीपुढे हगा म्हटलंय कारण मघा नक्षत्राचा पाऊस इतका सातत्याने पडतो की त्याच्या जोडीने थंडीही लवकर येते. मग अडलेला माणूस आपली कामंधामं करायला घराबाहेर पडू शकत नाही मात्र थंडीपायी त्याला चुलीपुढे येऊन बसावं लागतं),

आता आश्लेषा नक्षत्र सुरु आहे त्यासाठीची म्हण अशी आहे – मी येते सळाळा, मामाजी तुम्ही पुढिं पळा. म्हणजे काय ? आश्लेषाचा पाऊस हा आता होता आणि आता नाही अशा तऱ्हेचा असतो. तुम्ही पुढे आणि पाऊस मागे नाहीतर पाऊस पुढे आणि तुम्ही मागे असं याचं कोसळणं असतं. हा सूर ताल लावून पडत नाही आली लहर केला कहर आणि गेला सरसर अशी याची रीत !

पडतील पुक(पुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख ( असं का म्हटलंय – पुष्य नक्षत्राचा पाऊस दिवसा ढवळ्या धो धो कोसळतो. आता थांबला म्हणेपर्यंत पुन्हा संततधार सुरु होते. औताला बैल जुंपेपर्यंत आभाळ पुन्हा गळू लागतं. मग अशा वेळेस गड्याला कामाला जुंपता येत नाही. त्याच्यासाठी हा आरामच असतो, हे सुख त्याला क्वचित लाभतं )

पडल्या मिरगा (मृग) तर टिरीकडे बघा. (असं म्हणण्याचं कारण म्हणजे मृगात पेरणी होत नाही मात्र पेरणीपूर्व मशागतीची कामे केली जातात जी खूप महत्वाची असतात. जर का मृगाचा पाऊस पडला तर ही कामे खोळंबतात. परिणामी पुढच्या सर्व कामांचा विचका होतो. मग पावसाच्या मोसमाअखेरीस पोटावरून हात फिरवण्याची अनुभूती लाभत नाही. जुन्या मागच्या गोष्टीतच समाधान मानावं लागतं त्या अर्थाने टिरीकडे बघा असे शब्दप्रयोजन आहे)

पडता हस्ती कोसळतील भिंती ही साधी सुलभ म्हण आहे. हस्त नक्षत्रातला पाऊस दिवसभर जरी कोसळला नाही तरी त्याचा मारा इतका ताकदवान असतो की भिंती कोसळाव्यात. खेड्यापाड्यातली माय मराठी निसर्गाच्या प्रत्येक टप्प्यावर आपलं मत नोंदवते मग ते फटकळ असो वा काहीसं अश्लील, त्यात वास्तव झळकतंच !

गावाकडची मराठी शुद्ध की अशुद्ध या भानगडीत न पडता ती एक ग्राम्यबोली आहे जी आपल्या मायमराठीला सचेतअवस्थेत ठेवते आणि तिची जुनी वीण उसवू देत नाही याला मी महत्व देतो. शिवाय तिच्यात जी मिठास आहे ती अद्भुत आहे, तिचा लेहजा ढंगदार आणि न्यारा आहे. गावाकडच्या मराठीचं मातीवर आणि मातीत जन्मणाऱ्या अन मातीतच मरणाऱ्या भूमीपुत्रावर निस्सीम प्रेम आहे त्यामुळे ती अधिक जवळची वाटते यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही…

– समीर गायकवाड.

You Might Also Like

गृहकलह… शरद पवारांचे वारसदार कोण  ?

राजकारणाचे उद्योग; उद्योगाचे राजकारण

आघाडीत बिघाडी… काँग्रेस-शिवसेनेच्या नव्या दोस्तीची सुरुवात

‘सततची तोंडपाटीलकी’ नडली… अदृश्य महाशक्ती सुद्धा तितक्याच ताकदीने काम करतीय

लगाम लावाच…आता नाही सहन होत…

TAGGED: #rain #nakshatra, #तरणा #म्हातारा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रशियाने कोरोना लसीची केली नोंदणी; आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता, राष्ट्रध्यक्षांनी दिली मुलीला लस
Next Article मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश; अनिल राठोड यांची पोकळी भरुन काढणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?