□ लढवली होती नगरपंचायतची निवडणूक
श्रीपूर : तंबाखू का दिली नाही म्हणून दोघांमध्ये वाद झाला. त्यातून वादविवाद होऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. या सर्व प्रकारानंतर सर्वजण घरी गेले. पण त्यानंतर घरी गेल्यानंतर एकाचा मृत्यूल झाला. ही घटना सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील श्रीपूरमध्ये घडली. मयत हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ते असून त्यांनी नगरपंचायतची निवडणूकही लढवली आहे.
कल्याण लांडगे असे मयताचे नाव असून यात महाळुंग येथील बाबासाहेब भोसले याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी (ता.16) रात्री सव्वा आठच्या दरम्यान श्रीपूर येथे ही घटना घडली. वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे कार्यकर्ते असलेले कल्याण लांडगे यांनी नुकतीच झालेली महाळुंग -श्रीपुर नगरपंचायतीची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्या शेजारीच राहणारे महेश रणपिसे व महाळुंग येथील बाबासाहेब भोसले यांच्यामध्ये वैमनस्य आले होते.
One of the deprived Bahujan Aghadi died in a fight in Solapur over not giving tobacco
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शनिवारी रात्री श्रीपूर येथील शक्ती वाईन्स समोर कल्याण लांडगे उभे असताना त्या ठिकाणी बाबासाहेब भोसले आला व त्याने तंबाखू मागितली. कल्याण लांडगे यांनी तंबाखू दिली नाही म्हणून दोघांमध्ये वाद झाला. त्यात कल्याण लांडगे यांना लाथाबुक्क्यांनी व कोल्हापुरी चपलीने मारहाण करण्यात आली, असे कल्याण लांडगे यांचा मुलगा करण लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
घरी परतल्यानंतर कल्याण लांडगे यांनी अंग दुखत आहे म्हणून आपल्या मुलाला शरीराला मालिश करण्याचे सांगितले. मुलाने वडिलांच्या शरीराला मालिश करून तो हात धुण्यासाठी जाऊन परत येईपर्यंत कल्याण लांडगे निपचित पडलेले आढळून आले. त्यांना तत्काळ अकलूज येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मुलगा करण लांडगे यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी पोलिसांनी बाबासाहेब भोसले (रा. महाळुंग) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. बाबासाहेब भोसले हे फरार आहे.
“या घटनेत एकावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत. बाबासाहेब भोसले हा फरार झाला असून त्याचा कसून शोध सुरू आहे.”
– वैभव मारकड (सहाय्यक पोलीस निरीक्षक ,अकलूज)