सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समारोपाच्या मिरवणुकीत विजेच्या धक्क्याने एका २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. काल रविवारी (ता. 17) रात्री अकराच्या दरम्यान महापौर बंगला येथे हा प्रकार घडला. रात्री उशीरापर्यंत त्या तरुणाचे नाव कळू शकले नव्हते. विजेचा धक्का बसल्यानंतर मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले.
उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. हा प्रकार नेमका कसा घडला? याची चौकशी सुरू होती. आज त्याचे नाव निष्पन्न झाले आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर तपासामध्ये घटनेचे कारण स्पष्ट होईल, असे सदर बझारच्या पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी सांगितले होते.
युवकाची आज ओळख पटली आहे. शेळगी येथे राहणार युवक सूर्यकांत चंद्रकांत निम्बर्गी असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आज समोर आले आहे. युवकाचे नातेवाईक हे आज दुपारी सदर बाजार पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे.
□ तरुणावर खंजीरने वार करून मारहाण; नऊजणांवर गुन्हा
सोलापूर : तुला लय मस्ती आली आहे का तुझा भाऊ कसा जेलमध्ये गेला तसा तुला जेलमध्ये घालतो असे म्हणून तरुणावर वार करून हाताने मारहाण केल्याची घटना दि.१५ एप्रिल रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास बाळे क्रॉस रोड येथील मल्हार रिक्षा स्टॉप सोलापूर येथे घडली.
Solapur: A youth died on the spot due to electric shock during the procession
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याप्रकरणी मल्लिकार्जुन सुरेश हुल्लूर (वय-२२,रा. अंबिकानगर एमएससिबी ऑफिस समोरील,बार्शी रोड, बाळे, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरुन बाबाराज भोसले, अतिश गाडेकर, अभिषेक फुलारी, कालिदास शिंदे, आनंद व्हनमाने, सचिन भोसले, बापू सरवदे, सोहेल पठाण, समाधान सरवदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हा रिक्षा स्टॉप येथे रिक्षा मध्ये पॅसेंजर घेण्यासाठी थांबला होता. त्यावेळी वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादी याला तुला लय मस्ती आली आहे तुझा भाऊ कसा जेलमध्ये गेला तसा तुला देखील जेलमध्ये घालतो, असे म्हणून सर्वांनी मिळून हाताने मारहाण केली. त्यानंतर समाधान सरवदे याने त्याच्याकडे असलेला खंजीर हत्यार फिर्यादी मल्लिकार्जुन याच्या छातीवर पाठीवर मारून जखमी करून दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चौगुले हे करीत आहेत.
■ किरकोळ कारणावरून तरुणावर चाकू हल्ला
सोलापूर : किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूहल्ला केल्याची घटना १६ एप्रिल रोजी एमएसईबी ऑफिस बार्शी रोड सोलापूर येथे घडली. याप्रकरणी सोहेल महमंद उस्मान पठाण (वय-२३,रा. अंबिका नगर,एमएसईबी ऑफिसच्या समोर,बार्शी रोड, बाळे,सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून मल्लिकार्जुन सुरेश हुल्लुर,सुरेश हुल्लुर (रा. अंबिका नंबर, एमएसईबी ऑफिस समोर,बार्शी रोड,बाळे,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हा कामाला जाण्यासाठी पायी जात होता. त्यावेळी मल्लिकार्जुन याने फिर्यादी समोर येऊन फिर्यादीच्या कानाखाली चापट मारली. फिर्यादीने विचारणा केली असताना संशयित आरोपी मल्लिकार्जुन याने त्याच्या खिशातील चाकू काढून फिर्यादीवर वार केला. फिर्यादी सोहेल याने तो वर त्याच्या उजव्या हातावर घेतला व दुसरा वार करत असतांना संशयित आरोपी सुरेश हा घेऊन फिर्यादीला बाजूला ओढून घेऊन जोराने चापट मारून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिस नाईक परीट हे करीत आहेत.