Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर आगारातील एसटी वाहतूक पूर्णपणे सुरू; 70 टक्के कर्मचारी हजर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपूर आगारातील एसटी वाहतूक पूर्णपणे सुरू; 70 टक्के कर्मचारी हजर

Surajya Digital
Last updated: 2022/04/18 at 8:32 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

पंढरपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी  विविध मागण्यांसाठी  7 नोव्हेंबर 2021 पासून संप पुकारला होता. या संपात पंढरपूर आगारातील सर्वच कर्मचारी संपावर उतरल्याने एसटी वाहतूक बंद झालेली होती. मात्र आता पंढरपूर आगारातील एसटी वाहतूक पूर्णपणे सुरू झाली आहे.

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंढरपूर आगारातील 70 टक्के कर्मचारी हजर झाल्याने लांब पल्ल्याची 100 टक्के बस वाहतूक व ग्रामीण भागातील अंशत: बस वाहतूक सुरु झाली असल्याची माहिती वरीष्ठ आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी दिली.
पंढरपूर आगारात 5 जानेवारी 2022 ते 08  एप्रिल 2022 या कालावधीत 20 टक्केच वाहतूक सुरु होती. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंढरपूर आगारातील 70 टक्के कर्मचारी हजर झाल्याने बसच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्यांत वाढ करण्यात आली असून,  पंढरपूर- पुणे- फलटण मार्गे जाणारी साधी बस पंढरपूर बस स्थानकावरून सकाळी 6.00 ते 11.00 यावेळेत  दर एक तासाला, दुपारी 2.00 ते  सायंकाळी 6.00 यावेळेत  दर एक तासाला सुटेल,  तसेच   पुणे बस स्थानाकावरुन सकाळी 7.00 ते 11.00 यावेळेत  दर एक तासाला, दुपारी 2.00 ते  सायंकाळी 6.00 यावेळेत  दर एक तासाला निघेल.

ST traffic at Pandharpur depot fully resumed; 70 percent staff present

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

पंढरपूर- पुणे- फलटण मार्गे जाणारी शिवशाही बस सकाळी 5.00 वा. दुपारी 12.00, 01.00 व 3.00 वाजता सुटेल. पुणे बस स्थानकावरुन सकाळी 5.00, 6.00  वा. दुपारी 12.00 व सायंकाळी 7.00 वाजता निघेल. पंढरपूर – पुणे- करकंब मार्गे जाणारी साधी बस सकाळी  05.45, 07.15, 08.15 वाजता सुटेल. पुणे बस स्थानाकावरुन  सकाळी 11.45, दुपारी 12.45,02.45 वाजता  निघेल. पंढरपूर येथून  सोलापूर विना थांबा दर आर्ध्या तासाला सुटेल तसेच टेभुर्णी बस दर एक तासाला सुटेल.

पंढरपूर – मुंबई रातराणी रात्री 08.15 वाजता सुटेल व मुंबई येथून सायंकाळी 07.00 निघेल. पंढरपूर-मुंबई ( स्लिपर) रात्री 10.00 वाजता सुटेल व मुंबई येथून रात्री  09.00 निघेल.  त्याचबरोबर पंढरपूर आगारातून निजामाबाद, गुहागर, दापोली ,अलिबाग, हैद्राबाद, औरंगाबाद, नाशिक, शिर्डी, अहमदनगर, मेहकर, लातुर, बीड, गाणगापुर, आदी लांब पल्ल्याच्या बस सुरु करण्यात आल्या  आहेत.  पंढरपूर आगारातील सर्वच कर्मचारी संपावर उतरल्याने पंढरपूर  आगाराचे संप कालावधीत 15 कोटी उत्पन्न बुडाले असल्याचे  वरीष्ठ आगार व्यवस्थापक सुतार यांनी सांगितले.
अक्कलकोट, बार्शी, बीड, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर या लांब पल्ल्याच्या एसटी प्रवासी बस सुरू केल्या असून लवकरच कामगारांच्या उपस्थितीनुसार स्थानिक पातळीवरील प्रवासी बस वाहतूक सुरू केली जाईल.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #ST #traffic #Pandharpur #depot #fully #resumed #70percent #staff #present, #पंढरपूर #आगार #एसटी #वाहतूक #पूर्णपणे #70टक्के #कर्मचारी #हजर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आळशी लोकांच्या जीवावर महाराष्ट्रातली साखर कारखानदारी उभी
Next Article लाचखोर विद्युत अधिका-यास ठोकल्या बेड्या, लाचेसाठी खास कोल्हापूरहून आला सोलापुरात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?