सोलापूर : सांगली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात समस्त पुरोहित वर्गाबद्दल चुकीचे विधान करत त्यांची बदनामी केल्याबद्दल आमदार अमोल मिटकरी यांच्यावर तात्काळ गुन्हा दखल करावा, अशी मागणी सोलापुरातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली.
मारुती स्तोत्रचे म्हणून रामरक्षा स्तोत्र म्हणून दाखवत सगळ्याची फसवणूक केली तसेच कन्यादानच्या विधीची चेष्टा करत समस्त पुरोहित वर्गाला लज्जा वाटेल, असे विधान करत मेटकरी यांनी समाजाची बदनामी केली. यामुळे सोलापुरातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने जयंत फडके गुरुजी व ब्राह्मण समाजाचे नेते प्रा. काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेउन गुन्हा दाखल करण्या विषयी निवेदन दिले. जर गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कुलकर्णी यांनी यावेळेस दिला.
File an immediate case against the talkative MLA Mitkari; Demand of the entire Brahmin community
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावेळी वेद प्रतिष्ठानने पुढाकार घेत गुन्हा दाखल करण्याविषयी आग्रही भूमिका घेतली. यावेळी प्रसाद देशमुख , वैभव कामतकर , अनिरुध्द जोशी , राजाभाऊ कुलकर्णी , रंगनाथ उपाध्ये , हनुमंत हुंडेकरी , किरण उपाध्ये , आनंद हुंडेकरे , दिपक कुलकर्णी , किरण कुलकर्णी , हर्षल जोशी , राजु निंबर्गी , उमेश काशीकर , पंकज कुलकर्णी, अभिजीत तेरकर , आनंद तेरकर, प्रसाद पैठणकर, संपदा जोशी, प्रल्हाद देशमुख , सुमीत कुलकर्णी, बजरंग कुलकर्णी , विक्रम डोनसळे , राहुल उपाध्ये , सचिन वेणेगुरकर , निशिकांत खेडकर यांच्यासह वेद प्रतिष्ठान , ब्रम्हगर्जना प्रतिष्ठान , ब्राह्मण महासंघ , अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
□ अमोल मिटकरी काय म्हणाले….
सांगलीतल्या सभेत बोलताना अमोल मिटकरींनी एक किस्सा सांगितला होता. “एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान सुरु होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधरणार?”, असं मिटकरी म्हणाले होते.
दरम्यान, या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.
● अमोल मिटकरींची भूमिका
काल गुरुवारी (ता. 21) पुण्यात तर ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यासर्व प्रकारानंतर अमोल मिटकरी यांनी यासर्व प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही समाजाबद्दल अपशब्द वापरले नाहीत, असं म्हणत अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि जी लोक आज मला माफी मागा असं म्हणत आहेत, त्यांना माझा विनम्रतेने आवाहन आहे. राजमाता जिजाऊंच्या बाबतीत राजा शिवछत्रपती कादंबरीमध्ये ज्या बदनाम्या झाल्या आणि त्यांचं परत पुरस्कार करणारे वातावरण अगदी काही महाराष्ट्राच्या वातावरणात सुरू आहे. त्या पुरंदरे यांनी लिहिलेल्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या अपमानकारक मजकुराची माफी मागावी.”, असं मिटकरी म्हणाले.
तसेच पुढे बोलताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्यव्य केलं, त्यांनी तर त्याची माफी मागितली नाही, असं म्हणाले. तसेच, मी कुणाच्या जातीविरुद्ध धर्माविरुद्ध बोललो नाही, भाजप प्रणित संघटनांनी यामध्ये फक्त राजकारण चालविलं आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीकाही केली.