सोलापूर : सोलापूर – पुणे महामार्गावरील मोहोळजवळ आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास खासगी बस व जीपचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात विचित्र होता. या अपघातात अन्य प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बसचालकाने पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे.
मोहोळच्या दिशेने राँग साईडने भरधाव वेगात जाणाऱ्या लक्झरी बस ने बोलेरो जीपला धडक देऊन झालेल्या अपघातात नवरी सोडण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सारोळे फाटा (ता. मोहोळ) येथे आज शुक्रवारी (ता 22) पहाटे एक वाजता घडली. या अपघातात अरूण भानुदास केंगार (वय 35,रा पळशी) व सुरेश बबन भोसले (वय 30 रा सुपली ता. पंढरपूर) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळजवळील सारोळे पाटीजवळ खासगी बस व जीपची समोरासमोर धडक झाली. खासगी बस ही पंढरपूरहून मोहोळकडे येत होती, तर खासगी प्रवासी वाहतूक करणारी जीप ही मोहोळहून पंढरपूरकडे जात होती. यावेळी दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला.
Mohol: Two killed in bus and jeep accident
https://www.facebook.com/109399567404448/posts/525725429105191/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना गाड्यांमधून बाहेर काढून सुखरूपपणे पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.
पळशी (ता. पंढरपूर) येथील अरुण भानदास केंगार व सुपली येथील सुरेश बबन भोसले या दोघांनी सुपली गावातीलच बाळू वाघमारे यांची बोलेरो जीप क्रमांक एम एच 13 ए झेड 3869 ही घेऊन सोलापूर येथे नवरी सोडण्यासाठी गेले होते. या दोघांनी सोलापूर येथील हळदीचा कार्यक्रम उरकून सोलापूर येथून रात्री बारा वाजता सुपलीकडे जाण्यासाठी निघाले.
दरम्यान आज शुक्रवारी (ता 22) पहाटे एक वाजताच्या सुमारास दोन्ही वाहने सारोळे (ता. मोहोळ) येथील लादे वस्ती जवळ आली असता समोरून रॉंग साईडने भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरी बस (क्रमांक ए आर 06 ए 8417 ) ने बोलेरोला जोराची धडक दिली. त्यात दोघांच्या हाता, पायाला व डोक्यास मार लागून गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले.
या भीषण अपघातामध्ये बोलेरो गाडीचा जागीच चक्काचूर झाला असून लक्झरी बसचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची खबर न देता लक्झरी बसचा चालक वाहन सोडून पळून गेला असल्याची फिर्याद नवनाथ भानदास केंगार (रा. पळसी , ता. पंढरपूर) यांनी दिली आहे. पोलिसांनी लक्झरी बसच्या चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे व सहाय्यक फौजदार ज्योतिबा पवार हे करीत आहेत.