Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मृत बालकाच्या पालकांना एक लाखाची आर्थिक मदत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मृत बालकाच्या पालकांना एक लाखाची आर्थिक मदत

Surajya Digital
Last updated: 2022/04/22 at 8:54 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

● निलंबनाची कारवाईसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

उत्तर सोलापूर : चुकीच्या लसीकरणामुळे सोलापुरात एका दोन महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात संबंधित आरोग्य सेविकेस निलंबित करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. मात्र आज मृत बालकाच्या पालकांना एक लाखाची आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील प्रशांत कचोर मसलखांब (वय २ महिने) याचा चुकीच्या लसीकरणामुळे तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र डोणगाव येथे १५  सप्टेंबर २०२ङ० रोजी मृत्यू झाला होता. संबंधित डॉक्टर, आरोग्यसेविका यांच्यावर कार्यवाही करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आई,वडील,सरपंच संजय भोसले यांनी आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.

प्रशांत  कचोर मसलखांब नियमित लसीकरणाच्या दिवशी पेंटा, पोलिओ, रोटा अशा लसी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याला ताप आला, तापात झटके आल्यानंतर त्या बाळाला सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  उपचारादरम्यान २२ सप्टेंबर २०२०  मृत्यू झाला.

संतप्त जमावाने, लसीकरणानंतर कुठलाही पाठपुरावा न करणाऱ्या संबंधित आरोग्यसेविकेवर कारवाईची, बाळाच्या उपचारासाठी झालेल्या खर्चाच्या नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करून मृतदेह रुग्णालयातून डोणगाव येथे आरोग्य उपकेंद्रात ठेवले  होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी कारवाई व नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आश्वासन दिल्यानंतर जमावाने बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

One lakh financial assistance to the parents of a deceased child

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

संबंधित आरोग्यसेविका मुख्यालयी राहत नसल्याने, लसीकरणानंतर घडलेल्या घटनेदरम्यान कामावर अनधिकृतपणे गैरहजर असल्याने त्यासंदर्भात चौकशी होऊन आरोग्यसेविकेला निलंबित करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.

त्यानंतर या बालकाच्या पालकांना नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदत मिळावी याकरीता डोणगावचे सरपंच संजय भोसले, ग्रामस्थ सारिका वाघमारे, चित्रकला बनसोडे, पूनम मसलखांब आदींनी जवळपास दीड वर्षे जिल्हा परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी,  जिल्हास्तरीय पदाधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी पदाधिका-यांनी पाठपुरावा केला.

अखेर  २२ एप्रिल २०२२ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते मयत बालकाच्या पालकांना जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, तिऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोडसे, जनसंपर्क व प्रसिद्धी माध्यम अधिकारी रफीक शेख तसेच डोणगावचे सरपंच संजय भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #One #lakh #financial #assistance #parents #deceased #child, #मृत  #बालक #पालक #एकलाख #आर्थिक #मदत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्षय कुमारचा माफीनामा, मिलिंद सोमनचा पाठिंबा
Next Article विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीचे अभिजीत पाटील यांनी फुंकले रणशिंग

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?