सोलापूर : सोलापूर शहरातील टेस्टिंगचा वेग मंदावल्याने कोरोना रुग्णसंख्येतही घट होत आहे. मात्र सर्वात मोठी दिलासादायक बाब म्हणजे आजच्या अहवालानुसार आजपर्यंत चार हजाराच्यावर नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या अहवालानुसार एकही मृत्यू नसून नवीन 60 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
सोलापूर शहरात आज मंगळवारच्या अहवालानुसार कोरोनाचे 60 रुग्ण आढळून आले आहेत. आज एक ही बळी नाही, बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज 104 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये 67 पुरूष आणि 37 महिला रूग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 4 हजार 169 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 520 झाली आहे. त्यामध्ये पुरुष 3 हजार 221 तर महिला 2 हजार 299 रुग्णांचा समावेश आहे. आज एक ही बळी नाही. आतापर्यंत शहरांमध्ये 383 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 254 तर महिला 129 रुग्णांचा समावेश आहे.
मंगळवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 690 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 630 अहवाल निगेटिव्ह तर 60 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 39 हजार 811 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 33 हजार 4316 आहे. तर 5 हजार 520 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 968 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 169 आहे.