बार्शी : न्यायालयात चालू असलेली केस माघारी घेण्याच्या कारणावरुन दोघा भावांना लोखंडी रॉड, तलवार, लाकडी काठी आणि दगड यांनी मारहाण केल्याची घटना आळजापूर येथे १९ एप्रिल रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. वैराग पोलीस ठाण्यामध्ये सात जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विश्राम उर्फ विकी मधुकर घुगे यांची न्यायालयामध्ये शेता संदर्भात केस सुरू आहे. ही केस माघारी घेण्याच्या कारणावरुन बाळासाहेब लक्ष्मण नागरगोजे, सुरज पांडुरंग नागरगोजे, संदीप दिलीप नागरगोजे ,नितीन मनोहर नागरगोजे, मनोहर लक्ष्मण नागरगोजे ,पांडुरंग लक्ष्मण नागरगोजे ,दिलीप लक्ष्मण नागरगोजे, सर्व (रा. आळजापूर) यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड तलवारीने गंभीर मारून जखमी केले.
फिर्यादीचा भाऊ गहिनीनाथ यास लाकडी काठीने हातावर व डोक्यात दगड घालून जखमी केले तर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. दरम्यान मारहाणीनंतर दवाखान्यामध्ये उपचारासाठी दोघा भावांना दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वैराग पोलीस ठाण्यामध्ये बाळासाहेब लक्ष्मण नागरगोजे, सुरज पांडुरंग नागरगोजे, संदीप दिलीप नागरगोजे ,नितीन मनोहर नागरगोजे, मनोहर लक्ष्मण नागरगोजे ,पांडुरंग लक्ष्मण नागरगोजे ,दिलीप लक्ष्मण नागरगोजे अशा सात जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर हे करीत आहेत.
Barshi: Two beaten up for withdrawing case, seven charged
https://www.facebook.com/109399567404448/posts/527086885635712/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
■ चार वर्षे फरार असलेल्या आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर
बार्शी : गुन्हा घडल्यानंतर चार वर्षांनी पकडल्या गेलेल्या आरोपीची जामीन दिल्यास पुन्हा फरार होण्याची शक्यता गृहीत धरुन सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला.
निखिल तात्या भोसले असे या आरोपीचे नाव असून त्यास शहर पोलिसांनी 16 मार्च 2022 रोजी अटक केले आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. हनुमंत बगाडे हे 11 मार्च 2016 रोजी रात्रौ 6.45 च्या सुमारास कामावर जाण्यासाठी आपल्या दुचाकीवरुन निघाले होते. त्यांना आरोपीसह अन्य लोकांनी अडवून मारहाण करुन त्यांच्याकडील मौल्यवान ऐवज हिसकावून घेतला होता.
या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचे भाऊ सोमनाथ सुभाष बगाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी तेंव्हापासून फरार होता. त्यास 16 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून मोबाईल हॅडसेट, सोन्याची रिंग जप्त करण्यात आली. त्याच्याविरोधात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्यास जामीनावर मुक्त केले तर तो साक्षीदारांवर दबाव आणण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अति. सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला.
□ विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
बार्शी : रस्त्यातील माती माझ्या शेतात टाकू दे तू इथून उठून जा म्हणून एका महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या इसमा विरोधात वैराग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही घटना शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी चारच्या सुमारास बार्शी तालुक्यातील एका गावांमध्ये घडली आहे. याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, महिला फिर्यादी स्वतःच्या शेतामध्ये जेवण करीत असताना त्यांच्या शेताजवळ शेत असलेले विजय विठ्ठल सालगुडे याने शेतातील रस्त्याची माती माझ्या शेतात टाकू दे असे म्हणून येऊन बरेच वेळेस तू इथून उठून जा, असे सांगत तिच्या हाताला धरून ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
यावेळेस त्या मोठ्याने ओरडले असता सदर प्रकार कोणी सांगितल्यास बघून घेईल म्हणून धमकी देत शिवीगाळ करून पळून गेला. या प्रकरणी विजय विठ्ठल सालगुडे यांच्याविरोधात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस फौजदार अनुरथ देशमुख हे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/527063202304747/