मुंबई : राणा दाम्पत्याच्या जामीनावर वांद्रे कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. राणा दाम्पत्यावर 124 A कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं. राणा दाम्पत्याच्या जामिनासंदर्भात 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहेत.
बॉम्बे पोलीस ॲक्ट सेक्शन ३५ अंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुंबई पोलिसांच्या कारवाईत एखादी व्यक्ती अडथळा आणत असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. राणा यांनी पोलीस चर्चेसाठी गेलेले असताना वॉरंटची मागणी केली. पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यानुसार ही कारवाई केल्याचं स्पष्ट झालंय. कालपासून या संपूर्ण प्रकरणात एकूण पाच गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सोमय्यांनी वांद्रे पोलिसात दिलेला गुन्हा देखीलञ आला खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय .
राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं सांगितलं. यानंतर राज्यात राजकारण पेटलं आहे. मुंबईत मातोश्रीसमोर शिवसैनिकांनी दोन दिवसांपासून ठिय्या दिला आहे.अटक केल्यानंतर दोघांची वैद्यकीय चाचणी झाली आणि अखेर दाम्पत्याला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. आज तातडीने सुनावणी करण्यासाठी सुट्टीच्या कोर्टाचा पर्याय होता. त्यासाठी १२.३० नंतर सुनावणी पार पडली. त्यात राणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वांद्रे न्यायालयात न्यायदंडाधिकारी ए. ए. धानीवाले यांनी सुनावणी घेतली. हे सुट्टीचे न्यायालय असून धानीवाले हे विशेष दंडाधिकारी आहेत. ॲड. रिझवान मर्चंट यांनी राणांची बाजू मांडली. मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचं राणांच्या वकिलांनी सांगितलं. यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
Rana couple remanded in judicial custody for 14 days; Rana couple’s complaint against Uddhav Thackeray
https://www.facebook.com/109399567404448/posts/527094732301594/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राणा दाम्पत्यावर आयपीसी १५३ ए नुसार कारवाई केली आहे. एखादी व्यक्ती समाजात द्वेष पसरणारं वक्तव्य करते, दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल, आणि त्याला चिथावणी मिळेल असं कृत्य करते, त्यावेळी हे कलम लावण्यात आलं आहे. यासोबत आयपीसी ३४ आणि ३७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कलमांनुसार आरोपीला आपण केलेली कृती समाजाच्या शांततेविरोधात आणि कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागू शकतो, याची जाणीव असतानाही कृत्य केल्यास ही कलमं दाखल होतात.
येत्या २९ एप्रिलला या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. नियमित दंडाधिकाऱ्यांचं कोर्ट कार्यरत झाल्यावर जामीनावर सुनावणी होणार आहे. पाच दिवसांनी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
□ उद्धव ठाकरेंविरोधात राणा दाम्पत्याची तक्रार
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आज अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे मंत्री अनिल परब, खासदार संजय राऊत यांच्यासह 700 शिवसैनिकांविरोधात मुंबईतल्या खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेचे 700 कार्यकर्ते आपल्या घरासमोर हल्ला करण्यासाठी आले होते, असा आरोप राणांनी केला आहे.
दरम्यान, आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार संजय राऊत हे जबाबदार राहतील, अशी तक्रार खार पोलीसांत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/527086885635712/