सोलापूर : पैशाच्या देवाण – घेवाणीतून सोलापुरात खुनाची घटना घडली. यात एका महिलेसह तिच्या साथीदारांवर तालुका पोलिस ठाण्यात ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेचे आणि मृताचे अनैतिक संबंध असल्याचीही माहिती पुढे येत आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील दीपक उर्फ दादा कोळेकर (वय- ३५ ) याचा पैशाच्या देवाण-घेवाणीतून खून झाल्याची घटना शनिवारी (दि.२३) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित महिलेसह तिच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मयत दीपक यांचे वडील शिवाजी कोळेकर यांनी उत्तर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तपास सोलापूर तालुका सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक करीत आहेत. जयश्री व अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दिपक कोळेकर यांचे गावातील जयश्री भोसले (वय ४५) यांच्याशी गेल्या पाच वर्षापासून अनैतिक संबंध होते. दोन अडीच वर्षांपूर्वीपासून जयश्री भोसले दिपककडून पाच लाख रुपयांची मागणी करत होत्या. मागील वर्षी गणेश उत्सवात जयश्री भोसले हिने दिपक यांच्या घरी जाऊन पाच लाख रुपयांसाठी भांडण काढले होते. दिपक यांनी शेतातील जनावरे, ट्रॅक्टर, व बुलेट विकून जयश्री हिला पैसे दिले होते. माझे आणखी काही पैसे आहेत म्हणत जयश्री ही दिपकला सतत त्रास देत हाेती.
मयत दीपक कोळेकर यांचे वडाळा येथील चौकात पानटपरी दुकान आहे. शनिवारी (ता. २३) दुपारी चारच्या सुमारास पान टपरीत बसलेल्या दीपककडे जयश्री भोसले व सोबत अन्य साथीदार मयत दीपक यांना मोटारसायकलवर बसवून घेऊन गेले. रात्री साडेआठच्या सुमारास मयत दिपक याच्या भावाने वडील शिवाजी यांना दिपक याचा जयश्री भोसलेने खून केला असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्या वडीलांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता संशयित जयश्री हिच्या घरासमोरच्या गटारीमध्ये दीपक जखमी अवस्थेत दिसून आला, तर जयश्री हातात लोखंडी पाईप घेऊन उभी होती.
मयत दिपक यास उपचाराकरिता वडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तेथून पुढील उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दीपकला मृत घोषित केले.
Murder in Solapur for money, case filed against woman and her accomplices
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/527086885635712/
□ बेकायदेशीररित्या आंदोलन ; पाच जणांवर गुन्हा
सोलापूर : ब्राह्मण समाजाविरुद्ध अपशब्द वापरून अपमानीत केले असल्याने पुनम गेट येथे बेकायदेशीर जमाव जमून अमोल मिटकरी यांच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या वतीने घोषणाबाजी देऊन पुतळ्याचे दहन करून बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शनिवार, २३ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुनम गेट सोलापूर येथे घडली. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल शब्बीर महिबुब तांबोळी यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अजित प्रभाकर कुलकर्णी (वय-४८), खालिद मन्नान मणियार (वय-३२), इम्रान गणी नदाफ (वय-३८), आनंद चिदानंद आयवळे, (वय-३५), तायप्पा मल्लेशी मीरआईवाले (वय-२८ सर्व रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,वरील प्रहार संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील आदेशाचे उल्लंघन करून सांगली येथे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुरोहित ब्राह्मण समाजाविरुद्ध अपशब्द वापरून अपमानीत केले.
याप्रकरणी पुनम गेट येथे संघटनेच्यावतीने बेकायदेशीर जमाव जमून अमोल मिटकरी यांच्या निषेधार्थ व विरोधात घोषणाबाजी करून कापडी पुतळ्याचे दहन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस नाईक मुजावर हे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/527116088966125/