मुंबई : गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा आज षण्मुखानंद सभागृहात पार पडला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. देशाप्रती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
‘लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार’ पुरस्कार वितरण सोहळा आज मुंबईत पार पडत आहे. यासाठी पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला हजर झाले आहेत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला हजर नसल्याने विविध चर्चा होत आहे. या कार्यक्रमाला मंगेशकर कुटुंबियांपैकी आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर हे उपस्थित आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/527402762270791/
पंतप्रधान मोदी थेट काश्मीरहून मुंबईत दाखल झाल्याच्याही चर्चा आहेत. मोदींच्या राजकीय कामामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी आणि लतादिदी यांचं अत्यंत जीव्हाळ्याचं, अगदी भावा बहिणीचं नात होतं, गेल्या वेळी लता दिदींच्या अंत्यसंस्कारालाही मोदी मुंबईत आले होते. त्यानंतर त्यांच्या नावाने मिळणारा हा पहिला पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दाखल झाले आहेत.
पंतप्रधान मोदींसोबत यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे असे सर्व नेते एकाच व्यासपीठावर येणार होते. मात्र आता या सोहळ्याकडे मुख्यमंत्री ठाकरे पाठ फिरवली आहे. लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्यास उद्धव ठाकरे गैरहजर राहिले आहे. शिवसैनिकांच्या संघर्षाचा अपमान म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. तसेच हा पुरस्कार सोहळा सरकारी कार्यक्रम नसून खासगी कार्यक्रम आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यास राजशिष्टाचाराचेही बंधन नाही.
Prime Minister Modi honored with ‘Lata Mangeshkar’ award
https://www.facebook.com/109399567404448/posts/527212792289788/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
व्यासपीठावर आशा भोसले, मिनाताई खडीकर, आदिनाथ मंगेशकर उपस्थितीत होते. यांच्या हस्तेच हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आला आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहिले आहे. राज्य सरकारच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सुभाष देसाई हजर होते. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला हजर होते.
दरम्यान, त्याआधी येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, तीनही सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, लोकप्रतिनिधी आदींनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले.
□ मुंबईतील रस्त्यांवर शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष
मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपाय यंत्रणा, राणा दाम्पत्य संघर्ष, भाजप नेते मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांच्यावरील झालेला हल्ला यामुळे मुंबईतील रस्त्यांवर शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यावेळी संपूर्ण घडामोडींदरम्यान शिवसैनिकांनी मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाच्या संरक्षण आणि सन्मानासाठी जीवाची बाजी लावून दिवस-रात्र आंदोलनं आणि निदर्शेने केली. आता याच शिवसैनिकांच्या संघर्षाचा अपमान होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/527216285622772/