□ इथेनॉल निर्मिती करून पेट्रोलला करा हद्दपार
सोलापूर : साखर कारखानदारी नुकसानमध्ये जाणारी आहे. आपण साखर उत्पादनामध्ये जगात तिसऱ्या नंबर आहोत, वाढत्या ऊस उत्पादनावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी यांनी सोलापुरात चिंता व्यक्त केली आहे. ऊसामुळे आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशारा नितीन गडकरींनी दिला आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आज सोलापूरात रस्ते विषयक १० विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी गडकरी यांनी यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खा. जयसिध्देश्वर महास्वामी, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, राम सातपुते, रणजितसिंह मोहिते-पाटील, समाधान आवताडे इतर लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सोलापूरच्या रस्ते विकासाच्या जवळपास सर्वच कामांना मंजूरी दिल्याची घोषणा केली. उलट आरओबी अंतर्गत नवीन कामं मागा ती ही मंजूर करतो सोलापूरसाठी लॉजिस्टीक पार्कची योजना आणा, केबल रोपवे, बसची मागणी करा ती सुद्धा मंजूर करतो अशा स्वतःहून घोषणा केल्या. केंद्राकडून सुरु असलेल्या रस्ते विषयक कामात सर्वाधिक म्हणजे साठ हजार कोटींचे काम चालू आहेत. आता केलेल्या मागण्याचा विचार करता जवळपास १ लाख कोटीची कामं सोलापूर आणि परिसरात सुरु होणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.
साखर कारखानदारांना उसाचे दर काही कमी करता येणार नाहीत, तुम्हाला राजकारण करायचे आहे. त्यामुळे काय करायचे बघा. ऊसाच्या सायरपपासून इथेनॉल निर्मिती करा, मला आनंद आहे की आपल्याकडे इथेनॉल निर्मिती होते. इथून पेट्रोल हद्दपार करा, असं ते म्हणाले. साखर सरपल्स झाली आहे. ब्राझीलमध्ये साखर वाढली तर २२ रुपये साखरेचा भाव होईल. त्यावेळी मात्र उसाचे दर काही कमी करता येणार नाहीत. इतकं जास्त प्रमाणात लागवड होत राहिली तर एक दिवस आत्महत्या करावी लागेल हा माझा शब्द आठवणीत ठेवा, असं ते म्हणाले.
Nitin Gadkari expresses concern over rising sugarcane production in Solapur
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
ऊसाच्या सायरपपासून इथेनॉल निर्मिती करा. नाहीतर ऊसाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास कारखानदारांना उद्देशून भविष्यात आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. साखर घाट्यात जाणार आहे. त्यामुळे बगॅस वगैरेपासून हायड्रोजन निर्मित करायला सुरु करा. कारखानदारी नुकसानमध्ये जाणारी आहे. आपण साखर उत्पादनमध्ये जगात तिसऱ्या नंबर आहोत, असं गडकरी म्हणाले.
काही दिवसापूर्वी माझ्याकडे ब्राझीलचे शिष्टमंडळ आले होते. त्यांच्याकडे दुष्काळ पडलाय म्हणून आज महाराष्ट्रातील साखरेला चांगला भाव मिळतोय. भविष्यात साखरेला भाव मिळणे कठीण होणार आहे, त्यामुळे आतापासूनच साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर भर द्या, असेही आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/527799745564426/
गडकरी म्हणाले की, सोलापूर ते पुणे महामार्ग सहापदरी करण्याची मागणी आहे. दिल्लीला गेल्यानंतर तात्काळ डीपीआर तयार करून घेईन. सोलापूर विजापूर रस्ता लवकरच 6 लेन करण्यासाठी लवकर निर्णय घेऊ असंही ते म्हणाले. मागे सोलापूरला आलो असताना अनेक घोषणा केल्या होत्या. त्यापैकी अनेक घोषणा पूर्ण झाल्या. महाराष्ट्रामधील सर्वात जास्त काम सोलापुरात झाले असावीत असा माझा अंदाज आहे. जुना पूना नाका ते सात रस्ता पूल निविदा प्रक्रिया सुरु आहे, असं गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले की, चेन्नई सुरत मार्गांवर जाताना लॉजिस्टिस्क, इंडस्ट्री पार्क उभारा, विकास होईल. हा देशातला महत्वाचा हायवे असेल. मनालीमध्ये तयार करण्यात आलेल्या अटल टनेलमुळे 3 तासाचा वेळ केवळ 9 मिनिटात पूर्ण होतोय. आम्ही भूसंपादनासाठी 17 हजार कोटी रुपये दिले. भुसंपादन रक्कम वाढावी म्हणून महाराष्ट्रमध्ये काही जणांनी झाडं लावली आहेत म्हणून ऐकलं. आम्ही काय असले धंदे करणार नाही, असंही ते म्हणाले. इथं भाषणात ज्या ज्या आमदारांनी खासदारांनी मागण्या केल्या आहेत. त्या सर्व मागण्या मंजूर करण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली.
सोलापूर ते पुणे सहा पदरी करण्याची मागणी आहे. दिल्लीला गेल्यानंतर तात्काळ डीपीआर तयार करून घेईन. सोलापूर- विजापूर रस्ता लवकरच ६ पदरी करण्यासाठी लवकर निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले.
मागे सोलापूरला आलो असताना अनेक घोषणा केल्या होत्या. त्यापैकी अनेक घोषणा पूर्ण झाल्याचे आपणास समाधान वाटत आहे. महाराष्ट्रामधील सर्वात जास्त काम सोलापुरात झाले असावीत, असा माझा अंदाज आहे. जुना पूना नाका ते सात रस्ता पूल निविदा प्रक्रिया सुरु आहे.
लाईव्ह भाषणासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
मनालीमध्ये तयार करण्यात आलेल्या अटल टनेलमुळे ३ तासाचा वेळ केवळ ९ मिनिटात पूर्ण होतोय. आम्ही भूसंपादनासाठी १७ हजार कोटी रुपये दिले. भूसंपादन रक्कम वाढावी म्हणून महाराष्ट्रमध्ये काही जणांनी झाडं लावली आहेत म्हणून ऐकलं. आम्ही काय असले धंदे करणार नाही, असे ही ते म्हणाले.
भाषणात ज्या-ज्या आमदारांनी, खासदारांनी मागण्या केल्या आहेत. त्या सर्व मंजूर करण्याची घोषणा मी या ठिकाणी करतो, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.
इलेक्ट्रिक केबलवर बस, ट्रक चालतील असे प्रयत्न आहेत. पायलट प्रोजेक्ट सुरु आहे. यासाठी सोलापूरमधून प्रस्ताव पाठवा, लोकांना एसी गाडीमधून फिरवा. मी केवळ आश्वासन देत नाही आणि दिलं तर ते पाळतोच. सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी कागदपत्रे घेऊन जातोय. राज्य सरकारने हायवेच्या बाजूला जागा दिली तर लॉजिस्टिक पार्क बांधू, असंही ते म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/528037558873978/