सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ट्रक आणि इनोव्हा कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही आज घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या दुर्दैवी अपघातात 1 वर्ष तर ७ वर्षांच्या चिमुरड्याचा मृतात समावेश आहे. प्रत्यक्षदर्शी हा अपघात पाहून हळहळ व्यक्त करीत होते.
अपघातात जखमी झालेल्या चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या कारने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. शासकीय रूग्णालयामध्ये डॉक्टरांनी मयत आणि जखमींची नावे सांगितली.
दुपारच्या वेळी खूप उकाडा असल्याने ट्रकचालक दिवसा उन्हात वाहन चालवणे टाळतात आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला लावतात. मात्र, इतर वाहनचालक घाईत असल्याने अशा अपघाताच्या घटना घडतात. अशातच हा भीषण अपघात झाला आहे.
Innovator and truck crash in Solapur, five killed and four injured
https://www.facebook.com/109399567404448/posts/527729515571449/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर इनोव्हाची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे हा भीषण प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळेच वेळीच वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
(एमएच क्यू डब्लू 9587) हा माल वाहतूक ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. या ट्रकला पाठीमागून भरधाव आलेल्या इनोव्हा कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील पाचजण जागीच ठार झाले. कारची धडक इतकी जोरदार होती की अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. कारचा दर्शनी भाग थेट ट्रकच्या खाली गेला आहे. क्रेन लावून कारला बाहेर ओढून काढले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/528037558873978/