सांगली : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सांगलीमध्ये अपघात झाला आहे. भिडे गुरुजी सायकलवरून पडले आहेत. सायकल चालवून बाहेर जात असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्यातून ते जमिनीवर कोसळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भिडे गुरुजी सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी सायकलवरून जात होते. यावेळेस हा अपघात झाला. त्यांना अचानक चक्कर आल्यामुळे ते सायकलवरुन खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. संभाजी भिडे यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्रात मोठा मानणार वर्ग आहे.
संभाजी भिडे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे संभाजी भिडे यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले. संभाजी भिडे यांना केवळ मुका मार लागला आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचेही धारकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
Accident of Sambhaji Bhide, the condition is serious
https://www.facebook.com/109399567404448/posts/529154152095652/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
गुरूजी हे सांगलीत राहतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एकेकाळचे प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे आहेत. संभाजी भिडे हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. पण संघातील काही जणांशी वाद झाल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये श्री शिव प्रतिष्ठानची स्थापना केली. बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी वाद उफाळला होता तेव्हा भिडे गुरुजींची संघटना राज्यभरात चर्चेत आली होती. तेथूनच ही संघटना पुढे आली.
संभाजी भिडे यांची अपघाताची बातमी अनेकांसाठी धक्कादायक आहे. भिडे गुरुजींनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना सर्वांकडून केली जात आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. भिडे गुरुजी आजही सायकलनेच प्रवास करतात. त्यामुळे अनेकांना या गोष्टींचं अप्रुप वाटतं. संभाजी भिडे हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळेही प्रसिद्ध आहेत. ते त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात.
अशा स्वभावामुळे संभाजी भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधान करून वाद ओढावून घेतला आहे. कोरोनाच्या काळात ‘कोरोना हा मुळी रोगच नाही. कोरोनामुळं मृत्यू होणारी माणसं जगण्याच्या लायकीचीच नाहीत. मास्क लावण्याचा सिद्धांत कोणत्या शहाण्याने काढला, मास्क लावण्याची वगैरे काहीही गरज नाही’, असं धक्कादायक विधान देखील भिडे यांनी केलं होतं. त्यामुळे सर्वत्र टीका झाली होती.
दोन दिवसाखालीच महात्मा गांधींवर विधान केले. संभाजी भिडे म्हणाले, व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. समाजात खाण्या पिण्यातून अनेकांना विषबाधा होते. पण या भूत-विष बाधावर उपाय आहे. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच बाधा, दुसरी आंग्ल बाधा, तिसरी गांधी बाधा. या तिन्ही बाधावर तोडगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची उपासना आपण केली पाहिजे, असे म्हटले.