Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Mohl केंद्र सरकारच्या  विरोधात मोहोळ तालुक्यामध्ये ‘महायज्ञ’ आंदोलन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

Mohl केंद्र सरकारच्या  विरोधात मोहोळ तालुक्यामध्ये ‘महायज्ञ’ आंदोलन

Surajya Digital
Last updated: 2022/04/29 at 9:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

□ अक्कलकोटमध्ये संत गोरोबाकाका पुण्यतिथी साजरी

विरवडे बु :  इंधन दरवाढीसह महागाईविरोधात मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो या गावांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात महायज्ञ आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढीमुळे सर्वच क्षेत्राला झळ बसली आहे. प्रत्येकजण या महागाईमुळे मेटाकुटीस आला आहे. 

Central government’s protest ‘Mahayagya’ movement in Mohol talukya केंद्र सरकारने डिझेल पेट्रोल गॅस जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. दोन वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आता शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला जाऊन चार महिने होत आले तरी पण त्यांचे उसाचे बिल मिळत नाही व केंद्र सरकार दररोजच महागाई वाढवत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

ठाकरे सरकार लोडशेडिंग करून शेतकऱ्यांना त्रास देत आहे तर दुसरीकडे केंद्र सरकार डिझेल पेट्रोल गॅस व जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढवून  त्रास देत आहे. या सरकारला 33 कोटी देवांनी सुबुद्धी द्यावी यासाठी महायज्ञ करून देवाला प्रार्थना केली व सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी अनिल आबाजी पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष वैभव जावळे, हसन शेख, माजी सरपंच सागर राजेपांढरे, विश्वजीत पाटील, आबा देवकर, राजू पवार, सुरज पाटील, विकास जाधव, धनंजय गुंड आदी उपस्थित होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

● अक्कलकोटमध्ये संत गोरोबाकाका पुण्यतिथी साजरी

अक्कलकोट : भुरीकवठे येथे आज संत गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी निमित्त कुंभार गल्ली येथे गोरोबाकाका कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले,त्यानंतर मान्यवरांचे सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आले.

तदनंतर सरपंच मलम्मा रयगोंडे, उपसरपंच श्रीमंत कुंटोजी, ग्रामसेवक  रतनसिंग चव्हाण, महिला पोलिस पाटील शांता बंगरगी, ग्रामपंचायत सदस्या अमिना  ब्यलंबे, सुनिता  खुने,वैशाली घोडके, हणमंत पात्रे, शिवराज  कुंभार, विजकुमार व्हदलूरे, बसवण्णा  सोंनकटले, कलाप्पा  रायगोंडे, चंद्रकांत सोलापूरे यांची उपस्थिती होती.

भीम ज्योत तरुण मंडळाचे पदाधिकारी परमेश्वर  बनसोडे, ज्येष्ठ नागरीक परमेश्वर  कुंभार, प्रगतशील शेतकरी सिद्धाराम  कुंभार, विठ्ठल कुंभार,संदीप कुंभार, गंगाराम कुंभार गणेश,महेश, तुळशीराम, अजय, बालाजी, हणमंत, दिलीप, अमित कुंभार उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवानंद कांबळे यांनी तर आभार ओंकार कुंभार यांनी मानले.

 

 

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Central #government's #protest #Mahayagya #movement #Mohol #talukya, #केंद्र #सरकार   #विरोधात #मोहोळ #तालुका #महायज्ञ #आंदोलन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article #swamisamarth #swami स्वामी पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक स्वामींचरणी नतमस्तक; नामघोषाने आसमंत दुमदुमला
Next Article Dhule #swords धुळे : पुन्हा 90 तलवारी जप्त; चारही आरोपीना सुनावली कोठडी #custody

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?