□ समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असावे
सोलापूर : मंगळवेढा mangalwedea येथे उभारण्यात येणारे जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. काँग्रेस नेते तथा लिंगायत समन्वय समितीचे राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्य सरकारने ही समिती रद्द केली आहे. त्याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे.
Solapur: BJP-era M. Basaveshwar Smarak Samiti canceled due to inactivity भाजप सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बसवेश्वर स्मारक समिती स्थापन करण्यात आली होती. ती समिती निष्क्रिय असल्याची तक्रार जिल्ह्यातील लिंगायत समाजाच्या नेत्यांनी सरकारकडे केली. त्यानंतर राज्य शासनाने ती समिती रद्द केली. नव्याने समिती स्थापन करण्यासाठी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेल्या डॉ. बसवराज बगले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नवी समितीही गठीत
झाली.
स्मारक समिती स्थापन करीत असताना महाविकास आघाडीतील जिल्हाध्यक्ष किंवा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले. शिवाय या समितीमध्ये अभ्यासकार, इतिहासकार आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी नसल्याची तक्रार अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/529862045358196/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यांच्या याच तक्रारीची दखल घेत राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली समिती रद्द करण्याचा निर्णय ६ एप्रिल रोजी घेतला. त्याबाबतचे परिपत्रक जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
□ समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असावे
मुळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन स्मारक समिती गठीत होणे गरजेचे होते. पण, कोणालाही विश्वासात न घेता समिती न स्थापन करण्यात आली. त्यामुळे आम्ही स्मारक समिती रद्द करण्याची मागणी केली होती.
या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी समितीचे सचिव असणार आहेत. स्मारकाचा विषय पेंडिंग पडू नये. पालकमंत्री अध्यक्ष राहिले तर सातत्याने शासन दरबारी ते पाठपुरावा करु शकतील. परंतु आमच्यातीलच एका स्वयंघोषित नेत्याने शासन दरबारी लोकप्रतिनिधींची दिशाभूल करुन समिती गठीत करायला भाग पाडले.
या समितीत चुकीच्या पद्धतीने गठीत करण्यात आली होती. त्या चुका शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे समिती रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढावली. आता नव्याने होणारी स्मारक समिती अभ्यासपूर्ण होईल.
– विजयकुमार हत्तुरे, वरिष्ठ उपाध्यक्ष, काँग्रेस
https://www.facebook.com/109399567404448/posts/529863882024679/