दिसपूर : आसाममध्ये टाटा समूहाद्वारे 7 कॅन्सर हॉस्पिटल्स उभारण्यात आले आहेत. या हॉस्पिटल्स लोकार्पण कार्यक्रमात बोलताना रतन टाटा कमालीचे भावूक झाले होते. ‘मला हिंदीत भाषण देता येत नाही, त्यामुळे मी इंग्रजीत बोलेन. पण संदेश एकच असेल की माझ्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित करणार आहे. आसामला असं राज्य बनवा ज्याला सर्वजण ओळखतील आणि ज्या राज्याची वेगळी ओळख असेल, असे टाटा म्हणाले. Ratan Tata passionate, last years of my life …
उद्योगपती रतन टाटा अनेक कारणांनी लोकांच्या मनावर राज्य करतात. सामाजिक कामांसाठी त्यांचं योगदान फार मोठं आहे. काल आसाममधील एका कार्यक्रमात बोलताना ते कमालीचे भावूक झाले.यावेळी त्यांच्या स्वरांचा उच्चार थरथरत होता तर बोलतानाही अडखळत बोलत होते. आपला दानशुर स्वभाव, राष्ट्रप्रेमापोटी केलेली मदत आणि समाजातील अंतिम घटकाच्या मदतीसाठी कायम सक्रिय अशी ज्यांची जगभर ओळख आहे ते उद्योगपती रतन टाटा यांनी पुन्हा एकदा आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार असल्याची घोषणा केली आहे.
#WATCH Dibrugarh: "I dedicate my last years to health. Make Assam a state that recognizes & is recognized by all,"says industrialist Ratan Tata at an event where PM Modi will shortly be inaugurating 7 state-of-the-Art-Cancer-Centres & lay foundation stone for 7 new Cancer centres pic.twitter.com/LFbhjc6SA5
— ANI (@ANI) April 28, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित केली आहेत, असं रतन टाटा यावेळी म्हणाले. आसाममधील 7 कर्करोग देखरेख रुग्णालयांचे उद्घाटन आणि नवीन एका रुग्णालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.
यावेळी देशाचे पंतप्रधान मोदींनी टाटा ट्रस्टचे आभार मानले. आसामच नाही तर नॉर्थ ईस्टमध्ये कॅन्सर एक मोठी समस्या आहे. गरीबांना आणि मध्यमवर्गीयांना यामुळं मोठा त्रास सहन करावा लागतो. या रोगावर उपचारासाठी लोकांना मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं. तसंच मोठा आर्थिक ताण देखील येतो. या वर्गांसाठी हे हॉस्पिटल मोठा दिलासा असणार आहेत. यासाठी मी सर्बानंद सोनोवाल आणि टाटा ट्रस्टचं आभार मानतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, केवळ आसाम नाही तर ईशान्य भारतासाठी कॅन्सर ही एक मोठी समस्या राहिली आहे. यामुळे सर्वाधिक प्रभावित आमचा गरीब आणि मध्यम वर्गीय परिवार होतो. कॅन्सरवरील उपचारांसाठी काही वर्षांपर्यंत इथल्या रुग्णांना मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जावं लागायचं. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गियांवर मोठा आर्थिक ताण येत होता. गरीब आणि मध्यमवर्गियांची ही समस्या दूर करण्यासाठी 5 – 6 वर्षात पावलं टाकण्यात आली आहेत. त्यासाठी मी सर्वानंतर सोनोवाल, हेमंता सरमा आणि टाटा ट्रस्टचे आभार मानतो, असं मोदी म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/530184051992662/