मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री प्रेमा किरण यांचं मुंबईत निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 61 व्या वर्षी या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. Actress Prema Kiran passed away
अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. 80, 90 च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. प्रेमा किरण या निर्मात्या देखील होत्या. १९८९ मध्ये आलेल्या ”उतावळा नवरा” या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती.
प्रेमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नव्या कलाकारांना मालिकांचे पैसे तीन महिन्यांपर्यंत मिळत नाहीत. तसंच पडद्यामागील कलाकारांनाही कोणी वाली नाही. त्यांच्यासाठी राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचं ठरविल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलं होतं. प्रेमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचं ठरवल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलं होतं.
1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूमधडाका’ या चित्रपटात त्यांनी अंबाक्काची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीसोबतच त्या निर्मितीसुद्धा होत्या. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/531609701850097/
८० च्या दशकात प्रेमा किरण यांचे अनेक चित्रपट गाजले.लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतच्या त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी आपली नवीन ओळख निर्माण केली होती.
मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्याच्या बोलण्याच्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ”धुम धडाका” चित्रपटातील त्यांनी साकारलेली ”अंबाक्का” प्रचंड गाजली होती. फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्येही त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
झी मराठीवरील ‘हे तर काहीच नाही’ या कार्यक्रमात त्यांनी ‘दे दणादण’ या चित्रपटाविषयीचा एक किस्सा ऐकविला होता आणि सर्वांचे मन जिंकले होते. त्या चित्रपटातील ‘पोलीस वाल्या सायकल वाल्या’ गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांना सायकलवरून पाडलं होतं, तेही तीन वेळा हे त्यांनी उत्तमरीत्या रंगवून सांगितले होते आणि हशा पिकविला होता. त्यानंतर, ‘मी तीनवेळा पडले म्हणून सिनेमा हिट झाला’, असे सांगत त्यांनी सर्वांना पुन्हा खूप हसविले होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/531384441872623/