मुंबई : महाराष्ट्र दिनी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घेतलेल्या सभेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “काही लोकांचा गैरसमज आहे ते म्हणजेच महाराष्ट्र, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, 18 पगड जातीच्या लोकांनी बनलेला महाराष्ट्र आहे. मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही. पण तुम्ही म्हणजे हिंदूत्व नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. Fadnavis attacks Shiv Sena at BJP’s ‘booster dose’ meeting
येथील सोमय्या मैदानात भाजपची बूस्टर डोस सभा झाली. यावेळी फडणवीसांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ.आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह भाजप नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/532100148467719/
राज्यात हनुमान चालिसा म्हटले तर सरकार उलटून टाकण्याचा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शिवसेनेनी एकदा सांगावे की तुम्ही रामाच्या बाजूने आहे, की रावणाच्या बाजूने आहे, असा प्रश्न विचारत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. “मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली, आणि हे सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली,” असं विधान फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना केलं.
दरम्यान, मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे १४ तारखेला जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे १४ तारखेनंतरच खरी पोलखोल सभा घेणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 2) आपल्या बूस्टर डोस सभेत केला.
मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपचे सरकार स्थापन केले. यावरून टीका होत असताना फडणवीस यांनी मात्र पाकिस्तानला दाखवण्यासाठी मेहबुबासोबत गेलो असे सांगितले आहे. मेहबुबासोबत सरकार स्थापन करून भाजपने पाकिस्तानला दाखवून दिले की, कश्मीरमध्ये सरकार स्थापन होऊ शकते. म्हणूनच आम्ही मेहबुबासोबत सरकार स्थापन केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणतात, विरोधकांवर तुटून पडा. पण लक्षात ठेवा, अंगावर आलात तर तुम्ही तुटालही आणि पडालही, अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावर भूमिका मांडली. राज्यात महाविकास आघाडी सरकारने आणीबाणी आणून ठेवली. बिल्डर, दारू दुकानदार, विदेशी मद्यपींना मदत केली. पण बारा बलुतेदारांना काहीच दिले नाही. मुख्यमंत्र्यांचे वर्क फ्रॉम होम माहित होते, पण सरकारचे आता वर्क फ्रॉम जेल सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ बाबरी पाडताना तिथेच होतो, तुरुंगवासही भोगला
6 डिसेंबर 1992 रोजी सकाळी अयोध्येत देशभरातून तब्बल दीड लाख लोक जमा झाले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी त्यादिवशी बाबरी मशिदीभोवती ‘कारसेवा’ करण्याचं आवाहन केलं होतं.
मी बाबरी पाडली, असे गंभीर वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तुम्ही विचारता बाबरी पाडताना कुठे होता, मी अभिमानाने सांगतो मी तिथेच होतो, शिवसेनेचा एकही नेता नव्हता. असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तर मुंबई महाराष्ट्राची आहे, आणि राहणार, त्यामुळे त्यांनी त्यावर भावनिक राजकारण करू नये असे म्हणत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “परवा म्हणाले बाबरी मशिद पाडली तेव्हा कुठल्या बिळात होते. हे सांगतात आम्ही बाबरी मशिद पाडली. मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. कोणी हिंदू मशिद पाडूच शकत नाही. तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं हे अभिमानाने सांगतो.”
https://www.facebook.com/109399567404448/posts/531736655170735/
बदायूच्या तुरुंगात १८ दिवसांचा तुरुंगवासही भोगला. ढाचा पाडल्यानंतर ज्या ३२ जणांवर खटले चालले, त्यात शिवसेनेचा महाराष्ट्रातील एकही नेता नव्हता, असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, कारसेवकांनी बाबरीचा ढाचा पाडला त्यात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांवर गुन्हा दाखल नाही. मी त्यावेळी तिथेच होतो, मात्र तुम्ही कुठे होतात, असा विचारतच भाजपच्या 30 जणांवर गुन्हे दाखल झाले असेही त्यांनी म्हटले आहे. फडणवीस मुंबईतील भाजपच्या बुस्टर डोस सभेत बोलत होते.
बाबरी पाडल्याचे श्रेय कोणी घ्यायचे नाही, असे बैठकीत ठरले होते. कारण ते श्रेय रामसेवकांचे आणि कारसेवकांचे होते. आम्हाला प्रसिद्धीचा सोस नाही आणि अनुशासन मोडता येत नाही. त्यामुळे बाबरी ढाचा कोसळल्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजपने केला नसल्याचे फडणवीस म्हणाले.