Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मला नाही, निदान अतिक्रमण हटवण्यासाठी तरी पोलीस सुरक्षा द्या – महापालिका आयुक्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मला नाही, निदान अतिक्रमण हटवण्यासाठी तरी पोलीस सुरक्षा द्या – महापालिका आयुक्त

Surajya Digital
Last updated: 2022/05/03 at 5:51 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर : पोलीस आयुक्तालयाकडे मनुष्यबळ कमी असल्याने महापालिकेला पोलीस फोर्स मिळू शकत नसल्याचे पत्र पोलीस प्रशासनाने महापालिकेला पाठविले आहे. दरम्यान मला सुरक्षा नसली तरी चालेल मात्र शहरातील अतिक्रमण कारवाई वेळी पोलीस बंदोबस्त गरजेचा आहे, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी म्हटले आहे. I don’t, at least give police protection to remove the encroachment – Solapur Municipal Commissioner

पोलीस उपायुक्ताच्या स्वाक्षरीने महापालिकेला पोलीस फोर्स मिळू शकत नसल्याचे पत्र शनिवारी (ता. 30) महापालिकेला मिळाले आहे. मनुष्यबळ कमी असल्याने महापालिकेला मागणीनुसार पोलीस बंदोबस्त देऊ शकत नसल्याचे या पत्रात नमूद केले आहे. महापालिका आयुक्तांना पोलिसांकडून एक सुरक्षा रक्षक दिला जातो.

मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस
आयुक्त तसेच अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी असलेल्या एकूण सात पोलीस कर्मचारी पोलीस आयुक्तालयाकडून काढून घेण्यात आले आहे. यावर बोलताना आयुक्त म्हणाले की , पोलीस बंदोबस्त अभावी महापालिका प्रशासनाची अतिक्रमण विरोधी कारवाई खोळंबली आहे. किमान रस्त्यावर अडथळा असणारे अतिक्रमण काढण्यासाठी तरी वाहतूक पोलीस मिळावे. ते मिळाल्याशिवाय अतिक्रमण काढता येणार नाही. या संदर्भात आवश्यक ती चर्चा पोलीस प्रशासनाची करणार असल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून खासगी जागेतील अतिक्रमण कारवाई करिता महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनकडील शस्त्रधारी दहा सिक्युरिटी गार्ड मागवण्यात येणार आहेत, त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/533078695036531/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

□ अभियंता बडतर्फ तर उपअभियंत्यावर निलंबनाची कारवाई

सोलापूर : बेकायदेशीर काम केल्याबद्दल पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सहाय्यक अभियंता अतुल भालेराव आणि लिपिकास बडतर्फ केले तर कामात कुचराई करणाऱ्या ड्रेनेज विभागाचे उपअभियंता विजयकुमार बाबूराव राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. सोमवारी (ता. 2) एकाच दिवशी आयुक्तांनी ही कारवाई केल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे.

शौचालय पाडून ती जागा खासगी व्यक्तीच्या नावे केली तसेच इतर आरोपावरून सहाय्यक अभियंता अतुल भालेराव आणि लिपिकास पालिका आयुक्तांनी बडतर्फ केले आहे. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या जागेवर असलेले शौचालय बेकायदेशीररीत्या पाडून ती जागा परस्पर एका खासगी व्यक्तीच्या नावे केल्याने महापालिकेचे नुकसान केल्याचा ठपका भालेराव यांच्यावर ठेवला आहे.

भालेराव व त्यांचा सहकारी लिपिकास कामावरून काढण्याची कारवाई आयुक्तांनी केली. तर केंद्र शासनाच्या सफाई मित्र अभियान या ॲपवर सोलापूर महानगरपालिकेची माहिती भरण्यापूर्वी त्याची तपासणी करून खात्रीअंती ॲपवर अपलोड करण्याची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली नसल्याप्रकरणी ड्रेनेज विभागाचे उपअभियंता विजयकुमार राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/533094441701623/

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #least #police #protection #remove #encroachment #Solapur #Municipal #Commissioner, #निदान #अतिक्रमण #हटवण्यासाठी #पोलीस #सुरक्षा #सोलापूर #महापालिका #आयुक्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article case finally filed against Raj Thackeray ठाकरे सरकारच्या निशाण्यावर ‘हिंदू जननायक’, राज ठाकरेंवर अखेर गुन्हा दाखल
Next Article Raj Thackeray accused No. 1 एफआयआरमध्ये राज ठाकरे आरोपी नंबर 1; पोलिसांची धरपकड मोहीम चालू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?