● राज ठाकरे ‘भोंगा’ विषयावर ठाम
औरंगाबाद / मुंबई : औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एफआयआरमध्ये पहिला आरोपी म्हणून राज ठाकरे यांचे नाव आहे, त्यानंतर राजीव जेवळीकर व इतर आयोजकांचे नाव आहे. पोलिस निरीक्षक अशोक गिरी हे या प्रकरणाचा तपास करतील. राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण, वैयक्तीक टीका टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Raj Thackeray accused No. 1 in FIR; Police arrest operation continues
सध्या महाराष्ट्रात पोलिसांची धरपकड मोहीम चालू आहे. याला पार्श्वभूमी आहे मनसेच्या हनुमान चालिसा आंदोलनाची. संगमनेरमध्येही अशीच कारवाई करण्यात आली. मात्र येथे पोलिसांनी आम्हाला चहा पाणीसाठी बोलावून चर्चा करण्याचा बनाव करीत अचानक अटक केली. काहीही संधी न देता लगेच न्यायालयात नेले, असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. राज्यात सुमारे 15000 मनसैनिकांना प्रतिबंधात्मक नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
पोलिसांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेची शक्यता व्यक्त होत असल्याने मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर जमण्यास सुरुवात झाली आहे. शर्मिला ठाकरे शिवतीर्थावरून बाहेर, राज ठाकरेंच्या बंगल्याची सुरक्षा वाढवली. भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून बाहेर निघून गेल्या आहेत. त्या नेमक्या कुठे गेल्या याबद्दल नक्की माहिती मिळालेली नाही. राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थाच्या बाहेर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या बंगल्याच्या बाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/533229385021462/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
उद्यापासून होत असलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मनसे विभागप्रमुख महेंद्र भानुशाली यांना घाटकोपर पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. भानुशाली यांच्या कार्यालयात जाऊन भोंगाही जप्त करण्यात आला. भानुशाली यांनी सर्वप्रथम भोंग्यावर हनुमान चालीसा वाजवली होती. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांची कारवाईला सुरुवात झाली आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. महाराष्ट्राचे डीजीपी आणि मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संभाषण केले, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा झाली.
दरम्यान राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. ही मुदत संपूनही अद्याप कोणत्याही मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या इशाऱ्याप्रमाणे मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या सर्वांना 2 मे ते 17 मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश जारी केले गेले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/533226968355037/