Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मनसे इफेक्ट, पंढरपूरसह राज्यात अनेक ठिकाणी भोंग्यांविना नमाज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

मनसे इफेक्ट, पंढरपूरसह राज्यात अनेक ठिकाणी भोंग्यांविना नमाज

Surajya Digital
Last updated: 2022/05/04 at 4:17 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

मुंबई/ सोलापूर : राज्यातल्या अनेक भागात पहाटेची अजान भोंग्यांविना करण्यात आली आहे. पंढरपूर, कल्याण, मनमाड, रत्नागिरी, कल्याण, कोल्हापूरसह राज्यातल्या अनेक भागात पहाटेची अजान भोंगे न लावता करण्यात आले. यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुस्लिम बांधवांचे आभार मानले असून इतर मशिदींनीही असाच निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. MNS effect, Namaz without trumpets in many places in the state including Pandharpur

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसाठी अल्टीमेटम दिल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी मनसैनिकांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

मात्र, त्यापूर्वीच राज्यातल्या अनेक भागांमध्ये पहाटेची अजान भोंग्यांविना झाली आहे.
मुंबईतील धारावी येथे आजचे अजान आणि नमाज पठण शांततेत पार पडलं. शिवाय नागपूरमधील जामा मशिदीतही कमी आवाजात अजान पार पडले. रत्नागिरी, कल्याणसह अनेक मशिदींमध्ये अजान आणि नमाज पठण शांततेत करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचा नियम पाळल्याचे मशिदीतील लोकांनी यावेळी सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

माहीममध्ये नेहमी अजान वाजते, त्यामुळे काही मनसैनिक तिथे हनुमान चालिसा वाजवण्यास गेले होते. पण तिथे गेल्यावर शांततेत अजान आणि नमाज पठण करण्यात आल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे. मुंब्रा परिसरातील कौसा जामा मशिदीत आज पहाटे भोंग्याविना नमाज पठण आणि अजान करण्यात आली.

मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस यांना महाआरती झाल्या झाल्या लगेच अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याशिवाय अजय शिंदे, विजय तनपुरे बाळा शेडगे हे देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुण्यात पोलिसांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे.राज्यातल्या अनेक भागांमध्ये पहाटेची अजान भोंग्यांविना झाली आहे. रत्नागिरी, कल्याण सह अनेक मशिदींमध्ये अजान आणि नमाज पठण शांततेत करण्यात आली. धारावीतही पहाटेची अजान आणि नमाज पठण शांततेत पार पडलं.

दरम्यान , मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषदेतून राज ठाकरे पक्षाची भूमिका मांडत आहेत. या पत्रकार परिषदेत पत्रकारांचे प्रश्न घेतले जाणार नसून केवळ आपली आणि पक्षाची भूमिका मांडण्यात येणार आहे. काही सूचना तातडीने द्यायच्या असल्याने सहा वाजता नियोजित असलेली पत्रकार परिषद आपण एक वाजताच घेत आहोत, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.

 

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

TAGGED: #MNS -effect #Namaz #withou #trumpets in many places #state #Pandharpur, #मनसे #इफेक्ट #पंढरपूरसह 'राज्यात #अनेकठिकाणी अःभोंग्यांविना. नमाज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Declare municipal elections ‘एका आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा’, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Next Article सोलापुरात राडा तर कुठे मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?