मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक मिश्किल टिपण्णी केली आहे. “उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टींना उत्तर देणं सोडत नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी देखील आपली पातळी वर ठेवली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. A resemblance between my wife and Uddhav Thackeray Devendra Fadnavis believes in the next birth
उद्धव ठाकरे-अमृता फडणवीस यांच्यात रंगलेल्या सामन्यावरच देवेंद्र फडणवीस यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावर फडणविसांनी मिश्किल पद्धतीने पतिक्रिया दिली आहे. १ मे रोजी झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता. अमृता फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले होते. मला वाटलं होतं, अब्जाधिश फक्त आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे, असं त्या म्हणाल्या.
त्यावेळी ते म्हणाले होते की, ‘राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगले गातात असे मला आदित्यने सांगितले होते. आजपर्यंत एकाच व्यक्तीला गाता येते, असे मला वाटत होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
तसेच बाबरी मशीद पाडली जात असताना मी तिथे उपस्थित होतो, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना युवासेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला होता. फडणवीस तर १८५७ च्या उठावातही असतील, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या टीकेचा आता देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/533793804965020/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य आहे . उद्धव ठाकरे टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी बायको नको त्या गोष्टीला उत्तर देणे सोडत नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे, आणि अशा काही गोष्टी आल्या तर माझ्या पत्नीनेही त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे असे फडणवीसांनी म्हटले आहे.
● पुढील जन्मावर माझा विश्वास
आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस १८५७ च्या उठावातही सहभागी होते, अशी टीका केल्यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, “सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांना ना संघर्ष करावा लागला आहे, ना पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते करु शकतात, पण कितीही खिल्ली उडवली तेव्हा तिथे होतो याचा आम्हाला गर्व आहे.
मी हिंदू असल्याने मागील आणि पुढील जन्मावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्म असेल तर कदाचित १८५७ च्या युद्धात मी तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत लढत असेन. आणि तुम्ही असाल तर त्यावेळीही तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल. कारण आता ज्यांच्याशी तुम्ही युती केली आहे ते १८५७ ला युद्धच मानत नाहीत असे म्हणत फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
● महाविकास आघाडी सरकारचे अपयश
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. यावर बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे हे मला समजलेले नाही. पण मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पाच वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सहा महिन्यांहून अधिक प्रशासक ठेवता येत नाही अशी तरतूद आहे.
या कारणामुळे अशा सर्व ठिकाणी निवडणुका जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे संपूर्णत: महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. दोन वर्ष या सरकारने वेळकाढू धोरण अवलंबले. ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही. त्यामुळेच अशाप्रकारचा निकाल आला,” अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/533583208319413/