□ अक्कलकोट तालुक्यातील सर्वाधिक ग्राममपंचायतीचा समावेश
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 42 ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 48 जागासाठी 5 जून रोजी मतदान होणार आहे. 13 एप्रिल पासून निवडणूकीची प्रक्रिया चालू होणार आहे. यात अक्कलकोट तालुक्यातील सर्वाधिक 14 ग्राममपंचायतीचा पोटनिवडणूकीमध्ये समावेश आहे. Polling on June 5 for 48 seats in 42 Gram Panchayats in Solapur
शुक्रवार, 13 एप्रिलपासून निवडणूक कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. 13 मे पासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. अकरा तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत. 48 जागासाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/534953721515695/
अक्कलकोट तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीमधील 14 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. करमाळा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांसाठी, माढामधील दोन ग्रामपंचायतच्या 2 जागांसाठी, बार्शी मधील 5 ग्रामपंचायतच्या 5 जागांसाठी, उत्तर सोलापूर तालुक्यातील एक ग्रामपंचायतच्या 1 जागेसाठी, मोहोळमधील 2 ग्रामपंचायतच्या 3 जागांसाठी, पंढरपूर मधील 2 ग्रामपंचायतच्या दोन जागांसाठी, माळशिरसच्या 5 ग्रामपंचायतच्या 7 जागांसाठी, सांगोल्यातील 1 ग्रामपंचायतच्या 1 जागेसाठी, मंढळवेढा मधील 3 ग्रामपंचायतच्या 3 जागांसाठी, दक्षिण सोलापूर मधील 5 ग्रामपंचायतच्या 8 जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
□ असा असणार कार्यक्रम
– 13 ते 20 मे : अर्ज विक्री व स्वीकृती
– 23 मे, दुपारी 3 पर्यंत : प्राप्त अर्जांची छाननी
– 25 मे : अर्ज मागे घेण्याचा अंतीम दिवस
– 25 मे : दुपारी तीन पर्यंत : उमेदवारांची अंतीम यादी चिन्हासह प्रसिद्धी
– 5 जून : मतदान आणि मतमोजणी
_____________________________________
□ इचलकरंजी ही महाराष्ट्रातील 28 वी महापालिका घोषित, राज्य सरकारची घोषणा
#ichalkaranji #declared #घोषित #Mahapalika #surajyadigital #सुराज्यडिजिटल #इचलकरंजी #महाराष्ट्र #maharashtra
इचलकरंजी नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. इचलकरंजी आता राज्यातील 28 वी महापालिका घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिकांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे. राज्य शासनाच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे. इचलकरंजीची ओळख ही महाराष्ट्राचे मॅनचेस्टर अशी आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/534653448212389/