□ भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांचे आश्वासन
सोलापूर : ओबीसींच्या आरक्षणासह निवडणुका घ्यावेत, अशी आमची पूर्वीपासून मागणी होती. मात्र शिवसेना- कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून पाठीत खंजीर खुपसला आहे. तथापि, आगामी निवडणुकीत आम्ही सामाजिक न्याय डोळ्यासमोर ठेवून ओबीसींसाठी सकारात्मक धोरण समोर ठेवत समाजाला न्याय देऊ, असे भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी म्हटले आहे. Even if reservation goes, BJP will give justice to OBCs in Solapur
देशमुख म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च 2021 रोजी ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केले. न्यायालयाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट पूर्ण करून हे आरक्षण पुन्हा लागू करणे शक्य आहे. महाविकास आघाडी सरकारने त्यानुसार एंपिरिकल डाटा गोळा करुन तिहेरी चाचणी पूर्ण केली असती तर ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा अस्तित्वात आले असते. मात्र हे सरकार केवळ चालढकल करत राहिले व परिणामी ओबीसी समाजाचे कायमचे नुकसान झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता महापालिका निवडणूक होईल. आम्ही ही निवडणूक आम्ही ताकदीने लढवणार आहोत. त्यामध्ये भाजपची उमेदवारी देताना निश्चितच ओबीसीसाठी एक फॉर्म्युला तयार केला जाईल. आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. भाजपतर्फे या समाजाला न्याय देण्यात येईल, असे देशमुख म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/535040444840356/
काही महिन्यांपूर्वी सहा जिल्हा परिषदांच्या ओबीसी आरक्षित जागा रद्द होऊन पोटनिवडणुका झाल्या. त्यात भाजपने त्या खुल्या झालेल्या ओबीसींच्या जागेवर ओबीसींनाच तिकिटे देऊन निवडून आणले होते. तसेच धोरण पालिका निवडणुकीत असणार आहे, असेही देशमुख म्हणाले.
□ भाजपच पुन्हा सत्तेवर येणार
महापालिकेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक असते. त्यामुळे आम्ही गेल्या सहा ते सात महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. खास करून बुथवरच्या बांधणीला प्राधान्य दिले आहे. एक बुथ आणि 35 कार्यकर्ते अशी रचना आम्ही केली आहे.
विशेष म्हणजे केंद्र आणि राज्यातील वॉररूममधून प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करून याची खात्रीही केली आहे. त्यामुळे आमची ग्राऊंडलेव्हलपासून तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे गेल्या वेळेस प्रमाणे यंदाही भाजपच सत्तेवर येणार यात काहीही शंका नाही.
केंद्राने केलेली कामे आणि शहरात झालेली स्मार्ट सिटीची कामे या जोरावर आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुन्हा बाजी मारू, असे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/534953721515695/