सोलापूर : शहरालगत पुना नाका जवळ असलेल्या नागनाथ मंदिराजवळ एम.एच. १३ डी.के. ६१०९ या दुचाकीस पाठीमागून येणाऱ्या कंटेनर क्रमांक एम.एच. ४६ ए. आर. ६१८८ चालकाने धडक दिल्याने दुचाकीवरील महाविद्यालयीन तरुणी कंटेनर चाकाखाली येऊन जागीच ठार झाली. वैष्णवी संतोष सरवदे (रा.नामदेव सोसायटी, अंबिका नगर, बाळे) असे मयत झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव आहे. Solapur: Two-wheeler hit by container, college girl killed on the spot
शहरातील संगमेश्वर महाविद्यालयात ती बीएस्सीच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाकडून ती आपल्या दुचाकीवरून घराकडे परतत असताना जुना पुना नाका येथील नागनाथ मंदिराजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने तिला धडक मारली. डोक्याला मार लागल्याने ती जागीच ठार झाली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कंटेनर चालक हा कंटेनर बाजूला लावून फरार झाला. नागरिकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. काही महिला हळहळत होत्या. गर्दीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय पाटील व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मयत वैष्णवी सरवदे हिच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आह तिचे वडील एमआयडीसीमध्ये एका कारखान्यात कामाला आहेत. बाळे गावातील अनेक नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली होती. नातेवाईकांचा रडण्याचा आक्रोश जीव हेलावणारा होता.
या अपघात प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चालकास अटक केल्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/534653448212389/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ पोलीस निरीक्षकांसह चौघे निलंबित
सोलापूर – शहर पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षकांसह चार पोलिसांवर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक भगवान टोणे, राखीव पोलीस उपनिरीक्षक नागेश पवार यांच्यासह ड्यूटी बटवडा करणारे सहायक फौजदार संजय बायस, पोलीस हवालदार विश्वनाथ राठोड अशी निलंबित करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्या निलंबनाचे नेमके कारण समजू शकले नाही. या चौघांनाही एकाचवेळी निलंबित केल्यामुळे मुख्यालयास प्रभारी अधिकारीच उरला नाही. त्यामुळे प्रभारी अधिकारी पदाचा पदभार आयुक्तालयातील अधिकाऱ्यांकडे देण्याची वेळ आली आहे.
एकाचवेळी चार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त बैजल यांनी निलंबित केल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तेरा दिवसांपूर्वी जेलरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यासह चार ठिकाणच्या पोलीस निरीक्षकांची तसेच तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/535040444840356/