● सोलापूर जिल्ह्यात 179 तृतीयपंथी मतदार
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात तृतीयपंथीना मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी आता प्रमाणपत्र आथवा दाखल देण्याची गरज नाही गुुरूचे नाव अथवा दिक्षा घेतल्याचे नाव दिल्यास त्या तृतीयपंथीचे नाव समतार यादीमध्ये समावेश करावा असे आदेश उप सचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना. वळवी यांनी दिले आहेत. तसे पत्र जिल्हानिवडणूक कार्यालयास प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हानिवडणूक उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. Certificates are no longer required for third party registration; 179 third party voters in Solapur district
भारत निवडणूक आयोगाच्या दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण नवमतदार अभियान राबवण्यात येत आहे. छायाचित्रासह मतदारांच्या मतदार यादीमधील नाव नोंदणीचा उपक्रम घेण्यात येत आहेत. पात्र मतदाराने मतदार यादीत नाव नोंदविताना त्यांच्या अर्जासोबत ती ज्या ठिकाणी राहत आहे, त्या ठिकाणाचे त्याच्या पालक इत्यादी जवळच्या नातपाईक फोन बील,गैस कनेक्शन बील हे त्याच्या सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून स्विकारण्यात येतो तर मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी फार्म 6 भरताना तृतीयपंथीय व्यक्तीकडे त्याच्या सर्वसाधारण निवासस्थानाच्या पुराव्यादाखल कोणताही कागदपत्र नसती पाणी पुुरवठा बिल, टेलीफोन, बीज बील , गैस कनेक्शन बील सादर करू शकतात.
मात्र या पैकी एक पुरावा नसला तर ज्या व्यक्तीकडे त्यांनी दिक्षा घेतली आहे. त्या व्यक्तीचे प्रमाणपत्र लिहून दिल्यास अथवा नातेसंबंधाचे सादर केल्यास त्या तृतीयपंथीचे नाव मतदार यादीमध्ये समावेश करावे, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिले आहेत. मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये सोलापूर जिल्ह्याचे काम पहिल्या क्रमांकावर आहे. निवडणूक उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी चांगले काम केले म्हणून पुणे विभागात त्यांचा गौरव देखिल झाला आहे.
भारत वाघमारे यांनी जिल्हात नवमतदार नोेंदणी अभियाना अंतर्गत जिल्ह्यामध्ये 35 लाख 72 हजार 792 एकूण मतदार आहेत. यामध्ये 18 लाख 64 हजार 676 पुरुष मतदार तर 17 लाख सात हजार 937 महिला मतदार आहेत. वर्षभरात एक लाख 25 हजार 526 नवे मतदार वाढले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मतदार नोंदणी साठी तब्बल 92 हजार नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. वर्षभरात साधारण 68 हजार 930 मतदारांची नावे वगळली आहेत. 20 हजार 751 मतदारांनी दुरुस्तीसाठी अर्ज केले. चार हजार 173 मतदारांनी त्यांचे नाव दुसर्या मतदारसंघात समाविष्ट करण्यासाठी अर्ज केले. 15 जानेवारी 2021 च्या तुलनेत यंदा 79 तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढली आहे.सोलापूर जिल्हात 179 तृतीयपंथी मतदार झाले आहेत. या सोबत 30 हजार 156 पुरुष मतदार , 36 हजार 992 महिला मतदारांची नावे वाढली आहेत. असे एकूण 67 हजार नवीन मतदार वाढले आहेत.
□ झेडपी प्रारुप प्रभाग रचना आज आयोगासमोर सादर होणार
सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात प्रारूप प्रभाग रचना आज शनिवारी निवडणूक आयोगासमोर सादर केली जाणार आहे.
सोलापूरसह राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम येत्या 15 दिवसांमध्ये जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया व नागपूर वगळून 25 जिल्हा परिषदा व 284 पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्याला शनिवारी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रभाग रचनेचे कामकाज हाताळणारे एक अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे तसेच जनगणनेची आकडेवारी, निवडणूक विभाग/ निर्वाचक गणाची गावनिहाय आकडेवारी आणि नकाशे (सॉफ्ट कॉपीसह) घेऊन कार्यालयीन वेळेत आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.