Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Sangali big news सांगली : लाच स्विकारताना शिक्षण अधिकारी आणि अधीक्षकास रंगेहाथ पकडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

Sangali big news सांगली : लाच स्विकारताना शिक्षण अधिकारी आणि अधीक्षकास रंगेहाथ पकडले

Surajya Digital
Last updated: 2022/05/07 at 6:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सांगली : सांगलीत लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचा शिक्षण अधिकारी आणि अधीक्षकास लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे. पदवीधर श्रेणीत मान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी 3 शिक्षकांकडे प्रत्येकी 60 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. 1 लाख 70 हजार स्विकारताना लाचलुचपत पथकाने त्यांना ताब्यात घेतले. While accepting the bribe, the education officer and the superintendent were caught red handed

तीन शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. शिक्षणाधिकारी विष्णू मारूतीराव कांबळे (वय ५८) व त्याच विभागातील अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे (४१) अशी दोघांची नावे आहेत. 1 लाख 70 हजार रूपयांची लाच स्विकारताना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल शुक्रवारी रात्री दोघांना लाचेच्या रकमेसहीत पकडले.

शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे यांनी सोलापूर महापालिकेत शिक्षण विभागात प्रशासनाधिकारी म्हणून काम केले आहे. या ठिकाणी चांगली कामगिरी केल्याची माहिती आहे.

दोघांवर विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल झालाय. आत्तापर्यंतची सांगली जिल्हा परिषदेतील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

तक्रारदार व त्यांचे दोन शिक्षक मित्र यांचे पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली यांच्याकडे दिला होता. सदरचे काम करून देण्यासाठी शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार व त्यांचे शिक्षक मित्र यांचेकडे प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी 26 एप्रिल रोजी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

https://www.facebook.com/109399567404448/posts/535873601423707/

 

दिलेल्या तक्रारीनुसार अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने पडताळणी केली असता त्यामध्ये शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कांबळे, शिक्षण अधिकारी व सोनवणे, अधीक्षक यांच्याविरूध्द जिल्हा परिषद कार्यालय सांगली तसेच कांबळे यांच्या राहत्या घराजवळ सापळा लावला आणि 1 लाख 70 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.

शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे 1 लाख 70 हजार रूपयांची लाच स्विकारताना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल रात्री दोघांना लाचेच्या रकमेसहीत पकडले आहे.

 

□ रात्री घरासमोर लावला सापळा

 

जिल्हा परिषद आणि शिक्षणाधिकारी कांबळे याच्या घरासमोर सापळा लावला. तसेच सोनवणे याच्या कुपवाडमधील अहिल्यानगर येथेही सापळा रचण्यात आला होता. तक्रारदार यांनी सोनवणे याच्याकडे एक लाख सत्तर हजारांची रक्कम दिली. त्यानंतर शिक्षणाधिकारी कांबळे याच्या विश्रामबाग येथील कल्पतरू संकल्प सोसायटी येथे ही रक्कम दिल्यानंतर दोघांनाही रंगेहात कांबळे याच्या घरी पकडण्यात आले.

या दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. कारवाईत लाचलुचपतचे उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार अविनाश सागर, प्रितम चौगुले, धनंजय खाडे, सलिम मकानदार, सिमा माने, संजय संकपाळ, सजय कलगुटगी, रविंद्र धुमाळ, राधिका माने, भास्कर भोरे यांचा सहभाग होता.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/535746551436412/

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #accepting #bribe #educationofficer #superintendent #caught #red-handed, #सांगली #लाच #शिक्षणअधिकारी #अधीक्षक #रंगेहाथ #पकडले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article IAS Pooja Singhal आयएएस पूजा सिंघल ईडीच्या रडारवर; सापडले 19 कोटींचे घबाड
Next Article King Khan किंग खानला मिळाला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?