Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘माझ्या बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

‘माझ्या बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार’

Surajya Digital
Last updated: 2022/05/08 at 12:33 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

बीड : बीडच्या शिरुरमधील आनंद गावात एका अज्ञात व्यक्तीने एका 65 वर्षीय वृध्दाची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. कुंडलिक विघ्ने असे हत्या झालेल्या वृध्दाचे नाव आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ पोलीसांनी एक चिठ्ठी आढळून आली आहे. माझ्या बायकोचा खून झाला असून जोपर्यंत बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार, असे चिठ्ठीत लिहिले आहे. या माणसाला शोधण्यासाठी पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे.’ I will continue to kill until my wife’s killers are arrested’

कुंडलिक सुखदेव विघ्ने असं मृत शेतकऱ्याच नाव असून त्यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीमुळे पोलिसांसमोर मारेकर्‍याला पकडण्याचं आव्हान उभ राहिलं आहे. या खुनाच्या तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. तालुक्यात मागील काही दिवसांत कोणत्याही महिलेचा खून झालेला नाही. चिठ्ठीतून दिशाभूलही करत खुन्याचा प्रयत्न असू शकतो. असं सर्व बाजूंनी तपास सुरू आहे, अशी माहिती शिरुर कासारचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ यांनी दिलीय.

वृद्धाचा खून करून मारेकऱ्याने मृतदेहाजवळ एक चिठ्ठी ठेवली आहे. यामध्ये माझ्या बायकोचा खून झाला असून जोपर्यंत बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार, असं लिहून त्यांने पोलिसांना आव्हानच दिल आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/536386948039039/

 

शेतात आपल्या पिकाची राखण करण्यासाठी गेलेल्या कुंडलिक विघ्ने यांच्यावर अज्ञात मारेकर्‍याने मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कुंडलिक विघ्ने यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी आपले वडील घरी परत का आले नाहीत हे पाहण्यासाठी त्यांचा मुलगा शेतात गेला असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांनं पाहिला आणि घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली.

गावकरी आणि पोलीस तात्काळ घटनास्थळावर गेल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणचा पंचनामा केला. यावेळी मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली आहे. माझ्या बायकोचा खून झाला असून जोपर्यंत माझ्या बायकोच्या मारेकर्‍यांना अटक होत नाही तोपर्यंत खुनाचं सत्र सुरूच राहील असा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे.

मारेकर्‍यानं या चिठ्ठीमध्ये त्याच्या बायकोचा खून करण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी सुपारी दिली त्यांच्या नावाचा उल्लेख केला असून त्यांना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी विनंती केली आहे. तर लवकरच पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षकांची आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनं चिठ्ठीत नमूद केलंय. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून बीड पोलिसांची दोन पथकं या आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाली आहेत.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/536252924719108/

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #continue #kill #until #mywife's #killers #arrested #beed, #माझ्या #बायको #मारेकऱ्यांना #अटक #बीड #खून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Diesel rate and farmer डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना, शेतकरी हवालदिल
Next Article Musk Twitter Deal एलन मस्क विरोधात याचिका दाखल; ट्वीटरची खरेदी लांबणीवर?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?