Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Nagpur fire नागपूर हादरले, 15 सिलिंडरचे स्फोट, शंभर झोपड्यांचे नुकसान, मीडियावर हल्ला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

Nagpur fire नागपूर हादरले, 15 सिलिंडरचे स्फोट, शंभर झोपड्यांचे नुकसान, मीडियावर हल्ला

Surajya Digital
Last updated: 2022/05/09 at 6:25 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

नागपूर : नागपूर आज भयंकर सिलिंडर स्फोटाने हादरले. एकूण 15 स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे भयंकर आग लागली. यात 100 झोपड्यांचे नुकसान झाले. बेलतरोडी परिसरातील महाकाली नगरात ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. Nagpur fire shakes Nagpur, 15 cylinders explode, hundreds of huts damaged, media attacked Mahakali Nagar

 

आग नेमकी कश्यामुळे आणि कुठे लागली यासंदर्भात अद्याप खुलासा झालेला नाही, मात्र आगीच्या घटनेने अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही. मात्र एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

नागपूरमधील महाकाली नगरमध्ये आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. दोन तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले नाही. या आगीत काही झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याचे म्हटले जात आहे.

सुरुवातीला एका झोपडीत आग लागल्यानंतर शेजारच्या अनेक झोपड्या देखील जळत गेल्या, त्यामुळे अनेक घरातील समान जळून राख झाले आहे. आग बर्‍यापैकी आटोक्यात आली असून, अद्याप तरी यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

महाकाली नगरमध्ये सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली. स्फोटानंतर लागलेली आग वेगाने फैलावू लागली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी 6 ते 7 वेळेस स्फोटाचे आवाज ऐकू आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या आहेत.

https://www.facebook.com/109399567404448/posts/537282474616153/

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

महाकाली नगर मध्ये लागलेल्या आगीचे वार्तांकन करणाऱ्या एबीपी माझाच्या चमूवर काही स्थानिक तरुणांनी हल्ला केला. एबीपी माझाचे कॅमेरामॅन अतुल हिरडे यांना खाली पाडून त्यांच्या हातातला कॅमेरा खाली पाडण्यात आला. अतुल हिरडे यांना किरकोळ मार लागला असून ते सुरक्षित आहेत. तर कॅमेऱ्याचे नुकसान झाले आहे. एबीपी माझाशिवाय आणखी एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनवर काहींनी हल्ला केला असल्याचे वृत्त आहे.

पाण्याचे टँकरही पोहचले आहेत. मात्र झोपडपट्टी मोठी आहे. त्याशिवाय अरुंद गल्ल्या आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाला आग लागलेल्या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी वेळ लागत आहे. अनेक अडथळ्यांवर मात करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे. त्याशिवाय, स्थानिक नागरिकांकडून आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत.

खूप मोठ्या प्रमाणावर स्फोट झाल्यामुळे महाकाली नगर मधील अनेक कुटुंबांनी त्यांच्या घरातील महत्त्वाचे साहित्य तसेच घरगुती गॅस सिलिंडरसह सुरक्षित स्थळी धाव घेतली आहे. सध्या स्थानिक नागरिक आपल्या घरगुती साहित्यासह महाकाली नगरजवळच्या मोकळ्या मैदानावर आश्रय घेऊन आहेत. घटनास्थळी पोलिसांचा ताफा कमी असल्याने स्थानिक तरुणांचा धुडगूस सुरू आहे.

दरम्यान, नागपुरात तापमानाचा पारा ४५ अंशावर आहे. त्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आरबीआय चौकात चालत्या सिटी बसला आग लागली होती. यामधून प्रवास करत असलेल्या ३० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला होता. त्यापूर्वी देखील काही वाहनं जळून खाली झाली होती. या कडाक्याच्या उन्हात झोपडपट्टीत लागलेली आग विझविण्याचं आव्हान अग्नीशमन दलासमोर आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/537263591284708/

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Nagpur #fire #shakes #cylinders #explode #hundreds #huts #damaged #media #attacked #MahakaliNagar, #नागपूर #हादरले #सिलिंडर #स्फोट #शंभर #झोपड्या #नुकसान #मीडिया #हल्ला #महाकालीनगर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Barshi political शरद पवारांच्या सभेत विश्वास बारबोलेंचा होणार राष्ट्रवादीत प्रवेश
Next Article शिवपुत्र संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांच्या मनावर कोरला जाईल – विजयसिंह मोहिते – पाटील

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?