सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या हद्दीत आज बुधवारी नव्या 209 कोरोना बाधितांची भर पडली असून आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 84 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर शहर व तालुक्यात बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या 209 कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक 69 रुग्ण पंढरपूर तालुक्यातील आहेत. अक्कलकोट तालुक्यातील 8, बार्शीतील 11, करमाळ्यातील आठ, माढ्यातील 10, माळशिरसमधील 23, मंगळवेढ्यातील सात, मोहोळमधील नऊ, उत्तर सोलापूरमधील 15, सांगोल्यातील तीस व दक्षिण सोलापूर तालुक्यातील 19 कोरोनाबाधितांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मृत पावलेल्या आठ व्यक्तींमध्ये बार्शी तालुक्यातील तीन, माळशिरस तालुक्यातील दोन, सांगोला, उत्तर सोलापूर व अक्कलकोट या तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
कोरोनामुळे वैरागमधील 78 वर्षीय पुरुष, बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथील पन्नास वर्षिय पुरुष, बार्शी तालुक्यातील साकत येथील 61 वर्षिय पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील 62 वर्षीय महिला, माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील 65 वर्षीय महिला, माळीनगर येथील 58 वर्षीय पुरुष, सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील 45 वर्षिय पुरुष, अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील 65 वर्षिय पुरुष या आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.