Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Three children died सोलापूर : खेळता खेळता खेळ झाला, तीन चिमुकले मुले शेततळ्यात बुडाले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

Three children died सोलापूर : खेळता खेळता खेळ झाला, तीन चिमुकले मुले शेततळ्यात बुडाले

Surajya Digital
Last updated: 2022/05/10 at 7:51 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मोहोळ / चिखली : मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे होत्याचे नव्हते झाले. खेळता खेळता खेळ झाला. तीन मुले शेततळ्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. आई वडिलांचा काळीज भेदणारा हंबरडा ऐकून गावकरीही गहिवरले. आई – वडील पोटापाण्यासाठी बाहेर गेल्यावर ही दुर्दैवी घटना घडली. Solapur: While playing, the game was over, three little children drowned in the field.Mohol Shetfal

 

पोटाची खळगी भरण्यासाठी आईवडील भर उन्हात दुसऱ्यांच्या शेतात राबण्यासाठी गेलेले, घरी लहान लहान मुलेच राहिलेली, शेवटी ती लहानच. घरात खेळणारी ती मुलं अंगणात आली. अंगणातून खेळता खेळता शेततळ्याकडे गेली. खाली जमीन तापलेली, वर सूर्य कोपलेला. अशावेळी साहजिकच मुलांनी शेततळ्यातील पाण्यात पाय सोडून खेळणे पसंद केले. खेळता खेळता कधी आणि कुणाचा पाय घसरला कळले नाही. जेव्हा संध्याकाळी मुलांना शोधत शोधत आई तळ्याकडे आली, त्यावेळी तळ्यातील पाण्यात तिघांचेही मृतदेह तरंगताना दिसले आणि आईने हंबरडा फोडला.

हा प्रकार घडला आहे शेटफळ (ता. मोहोळ) येथील डोंगरे यांच्या शेतात. विनायक भरत निकम (वय ११), सिध्दार्थ भरत निकम (वय ८) आणि कार्तिक मुकेश हिंगमिरे (वय ५) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. झाले असे की, मृत विनायक, सिध्दार्थ व कार्तिक हे एकमेकांचे आतेभाऊ आणि मामेभाऊ आहेत. यांचे आईवडील हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवतात.

https://www.facebook.com/109399567404448/posts/537692577908476/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आईवडील सकाळी लवकरच कामाला निघून गेले होते. ही तिन्ही मुली ही घरीच होती. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून याचा अधिक तपास पोलीस हवालदार आदलिंगे हे करीत आहेत.

 

□ खेळता खेळता खेळ झाला

तिघेही लहानच. म्हणजे खेळत्या वयाचे. घरात खेळणारी मुले अंगणात आली. अंगणातून ती कधी शेतात गेली कोणाला कळलेच नाही. जेव्हा शेततळ्याजवळ गेली, तेव्हा सूर्य डोक्यावर आग ओकत होता. त्यामुळे साहजिकच ही मुले गारव्यासाठी म्हणून शेततळ्याच्या काठावर बसून पाण्यात पाय सोडून खेळू लागली. खेळता खेळात ती पाण्यात पडली आणि त्यांच्या जीवनाचा खेळ होऊन बसला, असे गावकऱ्यांमध्ये बोलले जात होते.

□ काळीज भेदणारा हंबरडा

मृत विनायक आणि सिध्दार्थ याचे वडील भरत निकम हे मूळचे माचणूर (ता. मंगळवेढा) चे आहेत. शेटफळ ही त्यांची सासुरवाडी. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून ते पत्नी रेश्मा व मुलांसह माचणूर सोडून शेटफळला आले होते. पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून ते दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला गेले आणि इकडे पोटची दोन्ही मुले पाण्यात बुडून मरण पावली. पोट भरता भरता पोटची दोन्ही मुले जिवानिशी गेल्यामुळे त्यांच्या माऊलीचा हंबरडा उपस्थितांचे काळजी भेदून जात होता.

□ चप्पल दिसली अन् काळीज चर्रर्र झालं…

दिवसभरातील मोलमजुरीचे काम संपवून सायंकाळच्या सुमारास आईवडील घरी आले. तेव्हा मुले घरात नव्हती. इकडे तिकडे कुठेतरी खेळायला गेली असतील म्हणून सुरुवातीला कानाडोळा केला. मात्र बऱ्याच वेळेनंतरही मुले घरी आली नाहीत म्हणून शोधाशोध सुरू झाला. शेजारीपाजारी पाहून झाले, इतर मुलांनाही विचारून पाहिले. पण मुलांचा ठावठिकाणा लागेना. जेव्हा शोधत शोधत शेततळ्याकडे गेले; तेव्हा शेततळ्याजवळ एका मुलाची चप्पल दिसली. म्हणून बांध चढून जाऊन शेततळ्यात पाहिले आणि काळीज चर्रर्र झालं.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/537282474616153/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #playing #game #over #three #little #children #drowned #field #Mohol #Shetfal, #सोलापूर #खेळताखेळता #खेळ #तीन #चिमुकले #मुले #शेततळे #बुडाले #मोहोळ #शेटफळ #चिखली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Shower and Tower अभिनेता रितेश देशमुखांच्या तोंडून ‘शॉवर अँन्ड टॉवर’ वॉटर पार्कचे कौतुक
Next Article जूनमध्ये होणार सुरत-चेन्नई महामार्गाची मोजणी; 12 तासांचे अंतर होणार कमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?