सोलापूर : शहरात सर्वत्र पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अशातच अधिकारी फोन उचलत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. त्यामुळे आता पाणीपुरवठ्याच्या तक्रारीसाठी नागरिकांना पालिकेशी संपर्क साधात येणार आहे. नागरिकांनी आपली तक्रार 2017- 2740362 / 63 या क्रमांकावर करावी, असे आवाहन पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.
शहरात सर्वत्र पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ही परस्थितीती आणखी काही दिवस राहणार आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच पाणीपुरवठा, झोन अधिकारी फोन उचलत नसल्याने नागरिक आणखीनच संतापत आहेत. त्यामुळे आता आयुक्तांनी पाणीपुरवठ्या संदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांना वरील क्रमांक दिला आहे. नागरिकांनी फोन केल्यावर पालिकेचा कर्मचारी संबंधित झोन विभागाला, झोन अधिकार्यांना नागरिकांची तक्रार कळवणार आहे.
त्यानंतर झोन अधिकारी कर्मचारी पाठवून नागरिकांची तक्रार दूर करतील, असे आयुक्तांनी सांगितले. याशिवाय त्यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि झोन अधिकार्यांचा एक व्हॉटसअप ग्रुपही तयार केला आहे. त्यामध्ये अधिकार्यांनी कोणत्या भागात, कधी आणि कितीवेळ पाणी सोडले याची माहिती कायम अपडेट करायची आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/538420607835673/
सोलापूर शहरात सध्या पाणीबाणी आहे. तशी ती गेल्या अनेक वर्षापासून आहे. परंतु खास करून उन्हाळ्यात ती अधिक तिव्रतेने जाणवते. पाण्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी झाला की पाणीबाणी निर्माण होते. अशी परिस्थिती निर्माण होण्याला काही नैसर्गिक कारणे आहेत. त्यावर मात करण्याचे प्रयत्नदेखील महापालिकेकडून होतात. परंतु काहीवेळा जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जातात. राजकारणही केले जाते. यामुळे पाण्याच्या असमतोल वितरणाचा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
सोलापूर शहरासाठी उपलब्ध असलेले पाणी पाहिले तर किमान एक दिवसाआड पाणी देता येणे शक्य आहे. गेल्या दहा वर्षात शहराच्या लोकसंख्येत फार मोठी वाढ झालेली नाही. उलट ती कमी होताना दिसत आहे. अशावेळी मिळणारे पाणी असलेल्या लोकसंख्येला पुरुन उरेल इतके आहे. उजनी धरण, औज बंधारा आणि हिप्परगा जलाशय अशा तीन ठिकाणांहून दारोज जवळपास दीडशे एमएलडी पाणी मिळते. शहराची गरजही इतकीच आहे. तरीही काही भागात तीन दिवसाआड तर काही भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा आहे.
□ ड्रेनेजच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर
पाणीपुरवठ्याच्या तक्रारीसोबतच आता आयुक्तांनी ड्रेनेज संबंधीच्या तक्रारीसाठीही नागरिकांसाठी टोल फ्री नंबर दिला आहे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी 14420 या नंबरवर कळवाव्यात, असे आवाहन आयुक्त शिवशंकर यांनी केले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/538447704499630/