पुणे : संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार, असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. तसेच ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं संभाजीराजे म्हणाले. Sambhaji Raje’s big announcement: Establishment of ‘Swarajya’ organization, will contest independent elections
राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली. ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले. तसेच ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
खासदार पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर लवकरच माझी पुढील दिशा जाहीर करणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आज संभाजीराजे कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार याबाबत उत्सुकता होते.
दिल्लीचे राजकारण करणार की महाराष्ट्राचे राजकारण या प्रश्नावर संभाजीराजे म्हणाले होते की, दोन्ही मला आवडतं. राजकारणात आता उतरायचंय हे आता निश्चित आहे. मग दिल्ली असो किंवा महाराष्ट्र असो, दोन्हीत मी रमतो असे संभाजीराजे म्हणाले होते. दोन्हीकडे माझे संपर्क वाढलेले आहेत. महाराष्ट्र माझ्याकडे बघतो की शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन दिल्लीत जायला पाहिजे. तर दिल्लीतल्या लोकांची इच्छा आहे शिवाजी महाराज, शाहूंचा वंशज इथे आला आहे, इथे त्याची ताकद वाढायला हवी असे ते म्हणाले होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539104647767269/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाजारांचे विचार पोहोचवण्यासाठी ही संघटना स्थापन करणार आहे.
पहिला टप्पा स्वराज्य संघटीत करणे हा आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे. ही संघटना, हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी वावगे ठरु नये. त्याला माझी तयारी आहे. पण पहिला टप्प्यात संघटीत होणे गरजेचे आहे. या महिन्यातच महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी पुढची आपली भूमिका आज जाहीर केली.
संभाजीराजे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज अखेर संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांची पुढील भूमिका जाहीर केली. राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वराज्य नावाची संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरु होती.
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमध्ये यावं त्यांचे स्वागत करु, असे जाहीरपणे सांगितले आहे. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाजीराजे यांचे स्वागत करु असे म्हटले होते. मात्र, आता संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे.
दरम्यान, एकीकडे संभाजीराजे महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर दुसरीकडे त्यांनी नुकतीच त्यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संधी मिळण्यात फडणवीस यांचंही योगदान असल्याने आपण त्यांचे आभार मानण्यासाठी ही भेट घेतली असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539063911104676/