पुणे – उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेस वेवर आज पहाटे बोलेरो जीप व ट्रकचा भीषण अपघात झाला. यात पाच जण जागीच ठार झालेत. या अपघातात मरण पावलेले सर्व जण पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील रहिवासी असून मृतामध्ये चार महिलांचा समावेश आहे. Yamuna Expressway crash in UP – Five killed in Pune
वाहन चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. बोलेरो जीप मागून जावून ट्रकवर आदळून हा अपघात झाला. हा अपघात आज पहाटे पाच वाजता यमुना एक्सप्रेस वे वरील जेवार टोल नाक्याच्या अलीकडे चाळीस किमीच्या परिघात झाला. या अपघातात दोन जण गंभीररित्या जखमीही झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्ट केलीय. उत्तर प्रदेशमध्ये यमुना एक्स्प्रेसवेवर झालेल्या अपघातात बारामतीच्या आमच्या चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना वेदनादायी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! अपघातात मृत्यू पावलेल्या पवार, बोराडे व कुंभार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येत असून जखमींची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित वैद्यकीय यंत्रणांना देण्यात आल्या आहेत, असे म्हटले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/539202401090827/
बेलोरा गाडीतून प्रवास करणाऱ्यांमध्ये चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे, मालन विश्वनाथ कुंभार, रंजना भरत पवार, नवंजन मुजावर, नारायण रामच्ंद्र कोळेकर, सुनीता राजू गस्टे यांचा समावेश आहे. यापैकी चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे, मालन विश्वनाथ कुंभार, रंजना भरत पवार, नवंजन मुजावर यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. तर नारायण रामच्ंद्र कोळेकर, सुनीता राजू गस्टे हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यमुना एक्स्प्रेस वेवर आज गुरुवारी पहाटे झालेल्या अपघातात चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटे 5 वाजता जेवार टोल प्लाझाजवळ झाला. अपघातानंतर सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या दोघांवर कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयानं ट्वीट करत म्हटलं आहे की, “उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यमुना एक्सप्रेस – वेवर दोन वाहनांमधील अपघातात मृत्यू झालेल्यांप्रती शोक संवेदना प्रकट केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत की, जखमींवर योग्य ते उपचार करावेत आणि मदत करावी.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. “मथुरेतील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना. यासोबतच मी जखमींना लवकरात लवकर बरे होवो ही कामना करतो.”, असं म्हटलं.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539200764424324/