□ ओवेसी औरंगजेबाच्या कबरीसमोर झाले नतमस्तक
औरंगाबाद : आम्ही कोणालाही घाबरणार नाही, ज्यांची लायकी नाही त्यांना आम्ही का उत्तर द्यायचे? असा प्रश्न उपस्थित करत एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. मी कुणालाही उत्तर देण्यासाठी आलो नाही, ज्यांना घरातून बाहेर काढले आहे. त्यांच्यावर काय बोलणार असा टोला अकबरुद्दीन औवेसी यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. आम्ही कुणालाही घाबरणारे नाही, असेही ते म्हणाले. What will happen to those who were kicked out of the house – Akbaruddin Owaisi, Owaisi bowed before Aurangzeb’s tomb
औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केलीय. कुत्रा भुंकतोय, भुंकू दे. सिंहाचे काम डरकाळी फोडणे आहे, त्यामुळे तुम्ही कुणाच्या जाळ्यात अडकू नका, अशा शब्दात ओवेसी यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुस्लिमांना अकबर ओवेसी विसरणार नाही. एमआयएमची ताकद नसतानाही २०१३-१४ मध्ये जंगी स्वागत करण्यात आले. प्रवास कठीण होता, पण महाराष्ट्रात लोक जोडले गेले आणि महाराष्ट्रातील मुसलमानांची मने जिंकल्याचे म्हटले.
अकबरुद्दीन ओवेसी यांनी कार्यकर्त्यांसह औरंगाबादमधील धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर त्यांची शहरात सभा पार झाली. यावेळी लवकरच मोठी सभा घेऊन उत्तर देऊ. जागा, वेळ मी ठरवेल आणि तुला उत्तर देईल. आता मी कुणाला उत्तर द्यायला आलो नाही. माझा तरी एक खासदार आहे तू तर बेघर आहे, तुला घरातून काढले आहे, ज्यांना घरातून बाहेर काढले, त्यांच्यावर मी काय बोलू? मी त्यांच्यावर बोलावे, ती त्यांची लायकी नाही, अशा कडवट शब्दात ओवेसींनी राज ठाकरे यांच्यावर टिका केली. आम्ही कुणाला घाबरणारे नाही. तुम्ही आम्हाला घाबरवणार आणि आम्ही घाबरणार हे शक्य नाही, असा इशाराही त्यांनी राज ठाकरेंना दिला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/539431234401277/
मुस्लिम समाजातील तरुणांनी कुणाच्याही भडकावण्याला बळी पडू नये. आम्ही त्यांना योग्य वेळी उत्तर द्यायला खंबीर आहोत. असेही आवाहन त्यांनी तरुणांना केले. देशात द्वेष पसरवला जातोय. पण मी प्रेम पसरवतो. इस्लाम आधी नाही संपला आता कोण संपवणार? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. भाषणाच्या शेवटी ओवेसींनी हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. हा देश जेवढा त्यांचा आहे, तेवढा माझा पण आहे. ना ही त्यांची जहागीर आहे, ना माझी आहे. आपण सगळे प्रेमाने राहू, देशाला पुढे घेऊन जाऊ, असेही ओवेसींनी म्हटले.
□ ओवेसी औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक
एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद येथील खुलताबाद येथे जावून औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक झाले. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणात तापणार असं चित्र दिसत आहे. आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासोबत यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, आमदार वारिस पठाण उपस्थित होते. या घटनेनंतर शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ओवेसींच्या कृतीवर कडाडून टीका केली आहे.
हिंदू धर्म नष्ट करण्याचं औरंगजेबाचं स्वप्न होते. तो अतिशय दुष्ट राजा होता. त्यामुळेच मुस्लीम धर्मातील लोक त्यांच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवत नाही. तिथल्या अन्य दर्गावर लोक जातात, त्या दर्गा वेगळ्या आहेत. परंतु औरंगजेबाच्या कबरीवर कोणीच जात नाही. एमआयएमचे लोक तिथे जाऊन आले असून यातून नवीन काहीतरी राजकारण करण्याचा त्यांचा उद्देश दिसतो, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.
खासदार जलील यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मुस्लीम धर्मानुसार तुम्हाला जिथे कबर दिसेल, तिथे उभा राहून दर्शन घ्यावं लागतं. आता खुलताबादेत अनेक महापुरुषांचे दर्गा आहेत. शिवाय खुलताबादला गेल्यानंतर कोणीही औरंगजेबाच्या कबरीवर जातोच. यात वेगळा अर्थ काढण्याचं कारण नसल्याचं जलील यांनी म्हटलं.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539235811087486/