सोलापूर : येथील श्री. मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूर, कै. विठ्ठलराव शिंदे वि. का सेवा सह. संस्था मर्या, अशा एकूण २० सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. The election of 20 co-operative societies in Solapur district has started
मतदार याद्या प्रसिध्द करणे, यावरील आक्षेप व अंतिम मतदार याद्या प्रसिध्द केल्यानंतर जून महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी संबंधीत संस्थांना प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सहकारी निवडणुकांच्या संस्थांच्या अनुषंगाने शहरातील कुमठे वि. का. सेवा सह. संस्था., कुमठे, शरद नागरी सहकारी बँक लि., महेश अर्बन को ऑप. बँक लि. , श्री. मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित सोलापूर जिल्हा प्रा. शि. सहकारी पतसंस्था नियमित, सोलापूर जिल्हा अपंग शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., साधना जिल्हा परिषद एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला से. सह. पतसंस्था, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कर्मचारी सह. पतसंस्था मर्या., साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची सह. पतसंस्था मर्या., सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख सेवकांची सह. पतसंस्था मर्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/539715217706212/
आणि सोलापूर जिल्हा आश्रमशाळा शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्या. या संस्थांचा समावेश आहे. पंढरपूर मधील श्री. दर्लिंग वि. का. सेवा सह. सोसा. लि. चळे या संस्थेचा समावेश आहे.
तसेच माढा येथील गारअकोले वि. का. सेवा सह. सोसा. लि., उपळाई खुर्द वि. का . सेवा सह. संस्था मर्या., कै. विठ्ठलराव शिंदे वि. का. सेवा सह. संस्था मर्या., उपळवटे वि. का. सेवा सह. सोसायी लि., रणजितसिंह शिंदे वि. का. सेवा सह. सोसायटी मर्या., निमगांव (मा) वि. सेवा सह. सोसायटी संस्था. अकोले (खुर्द) वि. का . सेवा सह. संस्था मर्या., अकोले (खुर्द) वि. का. सेवा सह. संस्था आणि सिध्दनाथ वि. का. सेवा समावेश आहे.
》मतदारयादी प्रसिध्दीकरणाचे वेळापत्रक
१) ९ ते १८ मे २०२२ दरम्यान प्रारूप (कच्ची) मतदार यादी प्रसिध्द करणे व यादीवर आक्षेप अगर दावे जिल्हा सह. निवडणुक अधिकारी यांच्याकडे सादर करणे.
२) २३ मे २०२२ रोजी प्रारूप मतदार यादीवर आक्षेप अगर दाव प्राप्त न झाल्यास अंतिम मतदारयादी प्रसिध्द करणे.
३) २६ मे २०२२ रोजी आक्षेप अगर दावे यावर जिल्हा सह. निवडणूक अधिकाऱ्यांनी द्यावयाचा निर्णयाचा दि.
४) 31 मे 22 रोजी प्रारूप मतदार यादीवर आक्षेप अगर दावे प्राप्त झाल्यास अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539431234401277/