नवी दिल्ली : सध्याच्या आधुनिक काळात आपण घरी बसल्या बसल्या एका क्लिक वर काहीही वस्तू मागवू शकतो. मोबाईल, बुट, खाद्यपदार्थ, औषधे या वस्तूंची होम डिलिव्हरी मिळते. पण आता डिझेलची होम डिलिव्हरी मिळणार आहे. हो खरंय… वाचा पुढे. Diesel will now get home delivery; Humsafar India to launch scheme in 200 cities across India
‘हमसफर इंडिया’ ही कंपनी भारतातील 200 शहरांमध्ये ही योजना राबवणार आहे. “सध्या आमच्याकडे डोअर स्टेप डिझेल डिलिव्हरीचा 20 टक्के बाजार हिस्सा आहे आणि आम्ही चालू आर्थिक वर्षात 30 टक्के हिस्सा मिळवण्याचा विचार करत आहोत,” असे कंपनीच्या सह-संस्थापक सान्या गोयल म्हणाल्या.
या स्टार्टअप कंपनीच्या सह संस्थापक सान्या गोयल यांनी म्हटले की ”सध्या आमचा या बाजारात डोअर स्टेप डिझेल डिलिव्हरीचा 20 टक्के भाग असून आम्हाला या आर्थिक वर्षात 30 टक्के भागीदारी करायची आहे. भारताच्या काना-कोपऱ्यात पोहोचायचे असून ऊर्जा वितरणात एक नवीन क्रांती घडवून आणायची आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/539963581014709/
देशभरात घरपोच इंधन वितरणाचं मॉडेल मध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. कोविडच्या कालावधीनंतर तर हे वेगाने वाढले आहे. या क्षेत्रात अधिक विस्तार करण्यासाठीच्या योजना आखल्या जात आहे. सध्या या कंपनीला ई-मोबाईल वाहन चार्जिंग स्टेशनच्या व्यवसायात प्रवेश करायचा असून त्यांची काही कंपन्यांशी चर्चा सुरु असल्याचे म्हटले.
देशभरात घरपोच इंधन वितरणाचं मॉडेल झपाट्याने विस्तारत आहे आणि कोविड नंतरच्या काळात ते आणखी वेगाने वाढले आहे. गेल्या आर्थिक वर्षात 30,000 कंटेनरची विक्री झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “आम्ही बाजारपेठेत अधिक विस्तार करण्याचं धोरण आखले आहे आणि चालू वर्षात ही संख्या दुप्पट होण्याची अपेक्षा ठेवली आहे आणि निर्यात करण्याचीही अपेक्षा आहे.”
त्यामुळे आता डिझेलची होम डिलिव्हरी देखील एका क्लिकवरून सहज होणार आहे. ही होम डिलिव्हरीची सुविधा हमसफर इंडिया ‘ही कंपनी देणार आहे. ही कंपनी आता चालू आर्थिक वर्षात भारतातील आणखी 200 शहरांमध्ये आपली डिझेलची होम डिलिव्हरी सुविधा देण्याची योजना आखत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539947061016361/