सोलापूर : सोलापूर शहरात आजच्या अहवालानुसार कोरोनाचे 30 रुग्ण आढळून आले आहेत. आज कोरोना मृत्यूची नोंद नाही. 14 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये 5 पुरूष आणि 9 महिला रूग्णांचा समावेश आहे.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 550 झाली आहे. त्यामध्ये पुरुष 3 हजार 236 तर महिला 2 हजार 314 रुग्णांचा समावेश आहे. आज एकही मृत्यू नाही, हे दिलासादायक आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 384 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 255 तर महिला 129 रुग्णांचा समावेश आहे.
आज बुधवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 526 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 496 अहवाल निगेटिव्ह तर 30 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 40 हजार 421 लोकांची तपासणी करण्यात आली.