ठाणे : मराठी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिका केल्याप्रकरणी केतकी चितळे हिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज तिला कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर ठाणे न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. Ketki Chitale remanded in police custody till May 18; Ketki’s own banana argument; Insist on not deleting posts
सकाळी केतकी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर केतकीच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीवर आतापर्यंत नऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
केतकीने वकील घेतला नाही. तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. यावेळी सरकारी पक्षाने सांगितले की, केतकीने लिहिलेल्या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. तिला 5 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/540977014246699/
युक्तीवाद करतांना केतकीने कोर्टात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. सोशल मीडियातून कॉपी करुन ती पोस्ट केली होती. समाज माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? मी या पोस्ट डिलीट करणार नाही. कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर आता केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर काल शनिवारी शाईफेक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची कळंबोली पोलिसांनी चौकशी केली. चौकशीनंतर केतकी बाहेर जात असताना तिच्यावर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याचे वृत्त आहे. दरम्यान केतकीविरोधात तीन ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
दरम्यान केतकी चितळे हिचा बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे. केतकी चितळे च्या वक्तव्याला फारस महत्व देण्याची गरज नाही त्या सोबत तिच्यावर कडक कारवाई देखील केली पाहिजे अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली आहे. मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात, अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव इथं केतकीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/540726150938452/