सोलापूर – पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करणाऱ्या बोलेरो जिपला पाठीमागून येणाऱ्या ऑक्सीजन टॅंकरने जोराची धडक देऊन अपघात झाला, यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही,वा कोणी जखमी नाही, मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. Mohol: Morning incident; Oxygen tanker jeep hit hard; Disaster averted
ही घटना यावली (ता मोहोळ) शिवारातील एका पेट्रोल पंपाजवळ आज रविवारी ( ता १५) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या संदर्भात मोहोळ पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी की, पिंपळखुटे (ता माढा) या ठिकाणावरून सोलापूरच्या दिशेने जाणारी बोलेरो जिप (क्रमांक एम एच ४५ एन १९१६) ही यावली शिवारात समोरच्या वाहनाला अचानक ओव्हरटेक करत असताना पाठीमागून येणारा टॅंकर (क्रमांक एच आर ३८ वाय ०९९६) याने जिप मध्ये असणाऱ्या लोकांना वाचविण्याच्या नादात अचानक ब्रेक दाबला.
मात्र ब्रेक न लागल्याने टॅंकरने जिपला धडक देऊन पुन्हा दोन्ही वाहने दुभाजकावर जाऊन आदळली. त्यात टॅंकर रस्त्यावर पलटी झाला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून टॅंकर चालकाच्या सतर्कतेमुळे जिपमधील सर्व नागरीक सुखरूप बचावले. त्यामुळे मोठी जीवीतहानी टळल्याची माहिती प्रथम दर्शनी अपघात बघणाऱ्या ग्रामस्थांनी दिली.
दरम्यान टॅंकरमध्ये ऑक्सीजन वायु होता. टॅंकर उचलताना कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून मोहोळ पोलीस ठाण्यातील अपघात पथकाचे सहाय्यक फौजदार जे एन पवार यांनी पुणे येथील ऑक्सीजन तज्ञांना पाचारण केले. ते घटनास्थळी आल्यावर त्यांनी सर्व परिस्थितीची पाहणी केली व धोका नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर टॅंकर क्रेनच्या सहाय्याने उचलून रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.
याबाबत मोहोळ पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरु होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/541199157557818/
□ आत्महत्या करण्याचा डाव फसला; चव्हाण वाडी येथील घटना
सोलापूर : चव्हाणवाडी (ता.तुळजापूर) येथे राहणाऱ्या गोविंद डाकू गायकवाड (वय ५५) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. गोविंद याने आज दुपारी घरातील छताच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास घेतला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्याला फासातून सोडवून शशिकांत (भाऊ) यांनी काडगाव येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे .
■ गुरांना वाचविताना झाडावर आदळली कार; 3 ठार
जळगाव : जिल्ह्यातील पळासखेड्या येथे गुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तरवाडे गावाकडे कारमध्ये जात असताना रस्त्यावर समोरून येणाऱ्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात असताना वाहनाच्या वेगाचा अंदाज न आल्याने ही कार रस्त्याच्या बाजूस असलेले निंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/540977014246699/